शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षीय मुलगी गर्भवती, तपासणीसाठी गेल्याने उघड झाला प्रकार; पालकांसह डॉक्टरांनाही बसला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 18:17 IST

महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. मात्र, आपल्यावर कुणीही बळजबरी केली नाही, आपला कुणाशीही संबंध आला नाही, असा दावा त्या मुलीने केला.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती : अमरावतीत एक १३ वर्षीय मुलीला दोन महिन्याची गर्भधारणा झाल्याची घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी उघड झाली. यात स्वत: ठाणेदारांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदविली तथा एका १७ वर्षीय मुलाविरुद्ध बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे पालक आपल्या १३ वर्षीय मुलीला घेऊन राजापेठ भागातील एका महिला डाॅक्टरकडे गेले. मुलीच्या ओटीपोटीत दुखत असल्याचे त्यांनी सांगितले. तपासणीदरम्यान ती १३ वर्षीय मुलगी चक्क दोन महिन्याची गर्भवती झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तिच्या पालकांसह डॉक्टरांनाही धक्का बसला. याबाबत संबंधित महिला डॉक्टरने राजापेठ पोलिसांना माहिती दिली. त्यावर ठाणेदार मनीष ठाकरे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांसमवेत संबंधित रुग्णालय गाठले. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. मात्र, आपल्यावर कुणीही बळजबरी केली नाही, आपला कुणाशीही संबंध आला नाही, असा दावा त्या मुलीने केला.

ती काहीही सांगण्यास तयार नव्हती. त्यामुळे जबाबदारी व कर्तव्य म्हणून ठाणेदार मनीष ठाकरे यांनी २० जून रोजी सरकारतर्फे अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केला. याबाबत बालकल्याण समितीला माहिती देण्यात आली तथा जिल्हा स्त्री रुग्णालयात तिची तपासणी करून बयाण नोंदविण्यात आले. २१ जून रोजी तिला विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आली तथा तिचे समुपदेशन करण्यात आले.

असा लागला त्याचा शोध

आपला कुणाशीही संबंध आला नाही, यावर ती मुलगी ठाम राहिली. मात्र, राजापेठ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्या मुलीच्या भाड्याच्या खोलीजवळचा एक अन्य अल्पवयीन भाडेकरू तिच्यावर पतीसारखा दबाव टाकत होता, त्याची वागणूकदेखील तशीच होती. तिच्या कुटुंबीयांसह काही शेजाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला. पुरेशी चौकशी व तपासानंतर त्या अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणेला तो १७ वर्षीय अल्पवयीन भाडेकरू कारणीभूत असल्याच्या निष्कर्षाप्रत राजापेठ पोलीस पोहोचले. त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध बलात्कार व पॉक्सो अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तो अल्पवयीन मुलगा शहरातून पसार झाला आहे.        

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती