शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
2
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
3
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
4
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
5
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
6
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
7
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
8
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
9
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
10
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
11
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
12
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
13
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
14
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
15
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
16
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
17
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
18
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
19
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
20
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?

बनावट तहसीलदाराच्या रक्तनात्यात १३ जणांकडे 'कास्ट व्हॅलिडीटी'

By गणेश वासनिक | Published: August 07, 2023 6:35 PM

कास्ट व्हॅलिडिटी समिती औरंगाबाद यांनी १९ नोव्हेंबर २०२० च्या आदेशान्वये वैष्णवी निलावाड, नेहा निलावाड व शीतल निलावाड यांचा 'मन्नेरवारलू' जमातीचा दावा अवैध घोषित केला.

अमरावती: राज्याच्या महसूल व वन विभागाने औरंगाबाद विभागातील बनावट 'कास्ट व्हॅलिडीटी’ असलेले नायब तहसीलदार दत्तात्रय बळीराम निलावाड यांना चक्क 'तहसिलदार गट अ' पदावर १ ऑगस्ट २०२३ रोजी पदोन्नती दिल्याची बाब ‘लोकमत’ने सोमवारी उघड केली. आता त्यांच्या रक्त नातेसंबंधी असलेल्या १३ जणांकडे 'कास्ट व्हॅलिडीटी' असल्याची धक्कादायक माहिती आहे.

तहसीलदार निलावाड यांचे रक्तनातेसंबंधी स्वाती दिगांबर निलेवार व विवेक दिगांबर निलेवार या दोघांचा 'मन्नेरवारलू' जमातीचा दावा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद यांनी अवैध घोषित केल्यानंतर सुद्धा ही वस्तुस्थिती समितीपासून लपविली. एवढेच नव्हे तर निलावाड यांनी स्वतः आणि त्यांचे ११ रक्तसंबंधी नातेवाईकांनी 'कास्ट व्हॅलिडीटी' मिळविली आणि अनुसूचित जमातीचा लाभ घेतला आहे. तसेच २ जणांनी शालेय अभिलेखातील नोंदी समितीपासून लपवून जातवैधता प्रमाणपत्राचा लाभ मिळविल्याचे पोलिस दक्षता पथकाच्या निदर्शनास आले, असे खुद्द औरंगाबाद समितीनेच १९ नोव्हेंबर २०२० रोजीच्या आदेशात नमूद केले आहे.  असे आले घबाड बाहेरमुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्र.६६१०/२०२० (वैष्णवी दत्तात्रय निलावाड विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर), रिट याचिका क्र.६६१३/२०२० (शीतल उत्तम निलावाड विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर) दाखल झालेल्या होत्या. तसेच नेहा सुभाष निलावाड यांनी शैक्षणिक प्रयोजनार्थ प्रस्ताव दाखल केला होता. औरंगाबाद खंडपीठाने याबाबत निर्णय कार्यवाहीसाठी समितीस आदेशित केले होते. एकाच कुटुंबातील रक्त संबंधी सदस्य असल्यामुळे त्यांचा जमातीचा दावा एकत्रितपणे पडताळणीचा निर्णय समितीने घेतला होता. यावेळी हे घबाड बाहेर आले. कास्ट व्हॅलिडिटी रद्द करून जप्त केलेकास्ट व्हॅलिडिटी समिती औरंगाबाद यांनी १९ नोव्हेंबर २०२० च्या आदेशान्वये वैष्णवी निलावाड, नेहा निलावाड व शीतल निलावाड यांचा 'मन्नेरवारलू' जमातीचा दावा अवैध घोषित केला. त्यांचे जमाती प्रमाणपत्र रद्द करून जप्त केले आहे. अधिनियम २००० च्या कलम १० ते १२ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश संबंधित शैक्षणिक संस्था आणि उपजिल्हाधिकारी (सेतू) औरंगाबाद, उपविभागीय अधिकारी कंधार यांना दिले आहेत. रक्त नात्यातील सर्वांचे जमाती प्रमाणपत्र,जातवैधता प्रमाणपत्र रद्द व जप्त करण्यात यावे आणि अधिनियम २००० मधील कलम १०, ११ व १२ नुसार दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. - बाळकृष्ण मते, राज्य उपाध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र

टॅग्स :Amravatiअमरावती