१३ सरपंचांना गौरविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:55 PM2018-02-21T22:55:16+5:302018-02-21T22:55:43+5:30

गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

13 To honor the Sarpanch | १३ सरपंचांना गौरविणार

१३ सरपंचांना गौरविणार

Next

अमरावती : गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
एकूण १३ कॅटेगिरीमध्ये दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी अमरावती जिल्ह्यातून ३५० नामांकने दाखल झाली होती. त्यातून प्रत्येक गटातून सर्वोत्कृष्ट तीन सरपंचांची निवड करताना ज्यूरी मंडळाचा कस लागला. तब्बल सहा तास परीक्षण चालले. या तीन सरपंचांपैकी प्रत्येक गटातून सर्वोत्कृष्ट कोण, यावर पुरस्कार वितरण समारंभात शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे क्षणोक्षणी उत्सुकता वाढत चालली आहे.
जल व्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामरक्षक, पर्यावरण संवर्धन, प्रशासन/ई-प्रशासन, रोजगार निर्मिती, कृषी या ११ कॅटेगिरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सरपंचांना सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय उदयोन्मुख नेतृत्व व ग्रामविकासाचे सर्वांगीण काम करणाºया सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द इयर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार आहेत.
‘सरपंच आॅफ द इयर’चा मान कुणाला?
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’मध्ये ११ कॅटेगिरीशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ आणि ‘सरपंच आॅफ द इयर’ हे आगळेवेगळे पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘सरपंच आॅफ द इयर’ या पुरस्कारासाठी अनेक सरपंचांनी नामांकने दाखल केली होती. त्यातून तीन सरपंचांची निवड अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. त्यातून सर्वोत्कृष्ट असा ‘सरपंच आॅफ द इयर’ हा पुरस्कार कुणाला मिळणार, हेसुद्धा पुरस्कार वितरण समारंभातच जाहीर होणार आहे.
पहिल्यांदाच गौरव
गावातील विकासकामांची दखल घेत ‘लोकमत’ने सरपंचांना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, सरपंचांचा पहिल्यांदाच अशाप्रकारे गौरव होत आहे. त्यामुळे या पुरस्कार वितरण समारंभाचे आकर्षण वाढले आहे. या कार्यक्रमाला नामांकन दाखल केलेल्या सर्वच सरपंच, सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पुरस्कारांसाठीचे जिल्हे
अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत यावर्षी हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहे.
संसद ते पंचायत
‘लोकमत’ने आदर्श खासदारांनी गौरविण्यासाठी पार्लमेंटरी अ‍ॅवॉर्ड सुरू केले आहेत. अशा प्रकारचा पुरस्कार सुरू करणारा ‘लोकमत’ हा पहिला माध्यम समूह ठरला आहे. संसद ते गाव हा प्रवास करीत ‘लोकमत’ आता सरपंचांनाही गौरवित आहे. राज्यात जनतेने या पुरस्काराचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे.
सोहळ्यात होणार मंथन
सरपंच अ‍ॅवॉर्डच्या जिल्हापातळीवरील सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ग्रामविकास व पंचायत राजबाबत महत्त्वपूर्ण मंथन या सोहळ्यात घडणार आहे. जिल्हाभरातून सरपंच या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातून ३१९ नामांकने
या पुरस्कार योजनेत अमरावती जिल्हयातून ३१९ नामांकने दाखल झाली आहेत. या नामांकनात नामवंत ग्रामपंचायतींसह दुर्गम भागातील सरपंचांच्या नामांकनांचाही सहभाग आहे. यानिमित्ताने अनेक नवख्या गावांच्या यशोगाथाही समोर येणार आहेत.

लोकमत माध्यम नेहमी अभिनव तसेच आकांक्षात्मक संकल्पना राबविण्यात पुढाकार घेत आहे. महाराष्ट्रातील धोरणकर्ते, लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर कार्यक्रमातील सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व ते तळागाळात जे हिमतीने काम करतात, अशा सर्वस्तरापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. ग्रामपातळीवर ज्यांनी उल्लेखनीय, दिशादर्शक काम केले आहे, अशा सरपंचांना गौरविण्यात आनंद होत आहे. एक जबाबदार माध्यम म्हणून ‘लोकमत’ नेहमीच आपले कर्तव्य बजावत आहे.
- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

लोकमत सरपंच पुरस्कारासाठी राज्यभरातून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून आनंद झाला. असा अभूतपूर्व कार्यक्रम घेण्यात बीकेटी टायर्सला आनंद होत आहे. बीकेटी टायर्स मीडिया प्रमोशन आणि रोड शो यांचाही आम्हाला चांगला फायदा झाला आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांमध्ये लोकांची रुची वाढत आहे.
- झुबेर शेख, एरिया मॅनेजर (अ‍ॅग्री सेल्स) महाराष्ट्र, बीकेटी टायर्स

भारतीय ट्रॅक्टर उद्योगात निर्विवाद नेता म्हणून आम्ही नेहमी कृषी उत्पादकता आणि ग्रामीण समृद्धी वाढविण्यासाठी नवीन कृषितंत्रज्ञान विकसित केले, ते शेतकºयांपर्यंत पोहोचविले. शेतकºयांशी असलेले आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी आम्ही ‘लोकमत’सोबत सरपंच पुरस्कार देण्यासाठी सहभाग घेतला आहे..
- रवींद्र शहाणे,
उपाध्यक्ष (पणन), महिंद्रा फार्म डिव्हिजन

Web Title: 13 To honor the Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.