शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापड बाजारात १२५ कोटींची उलाढाल

By admin | Updated: May 31, 2015 00:06 IST

विदर्भात कापडाच्या बाजारपेठेत अमरावती वरच्या क्रमांकावर आहे. संपूर्ण विदर्भातून ग्राहक येथील बाजारपेठेत कापड खरेदी ....

शहराच्या मध्यम भागात कापड बाजार : मुंबई, अहमदाबाद, सोलापूरमधून येतो मालमनिष कहाते अमरावतीविदर्भात कापडाच्या बाजारपेठेत अमरावती वरच्या क्रमांकावर आहे. संपूर्ण विदर्भातून ग्राहक येथील बाजारपेठेत कापड खरेदी करण्यासाठी येतात. किरकोळ आणि होलसेलचा कापडाचा बाजार येथेच असल्याने ग्राहक अमरावती शहराला पसंती देतात. किरकोळ बाजारामध्ये १२५ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती आहे. शहरात तखतमल इस्टेट, जवाहर रोड, जयस्तंभ चौक, गांधी चौक, महावीर मार्केट, राजकमल चौक, नमुना गल्ली इत्यादी ठिकाणी कापडाचे सुमारे १५० दुकाने आहेत. त्यामध्ये छोटे दुकानदार अमरावतीच्या होलसेल कापड बाजारातून खरेदी करतात. तर किरकोळ मोठे दुकानदार मुंबई, इंदौर, सुरत, अहमदाबाद, दिल्ली, बंगलोर, कलकत्ता, सेलम, दिल्ली इत्यादी ठिकाणच्या बाजार पेठेतून कापड खरेदी करतात. देशाच्या ेकानाकोप्यातील कापडाचा माल अवघ्या आठवडाभरात अमरावतीमध्ये पोहचतो. किरकोळ कापड खरेदी करण्यासाठी विदर्भातील ग्राहक मोठ्या संख्येने येथे येतात. कारण येथील किरकोळ कापड बाजारात प्रचंड व्हेरायटी पाहयला मिळते. सोबतच नामांकित कंपनीचे कापड किफायतशीर भावामध्ये मिळते. येथील कापड बाजारात पॅन्टचे कापड १०० रुपये ते २००० हजार रुपये मिटरपर्यंत उपलब्ध आहेत. तर शर्टचे कापड १०० ते १५०० रुपये मिटरपर्यंत उपलब्ध आहेत. कापडाच्या बाजारामध्ये पैजाम्याचे टेरीकॉट कॉपड, चड्डीचे पॉपलीन कापड, धोती, ब्लाउज पीस, दुपट्टा, टावेल, टोपी, रजाईखोळ, ब्लँकेट, शाल, देवाची वस्त्रे इत्यादी फाडी व कापडही किरकोळ बाजारात उपलब्ध आहे. संपूर्ण बाजारात नावाजलेल्या येथील किरकोळ कापड बाजारामध्ये अमरावतीचे नाव आहे. या किरकोळ कापड बाजारामध्ये सन १९०८ पासूनची कापडाची दुकाने आहेत. किरकोळ कापड बाजारात सुमारे १ हजार कामगार रोज काम करतात. त्यांना महिन्या ४ हजार ते २० हजार रुपये एवढे वेतन दिले जाते. वेतनाव्यवतिरीक्त कमिशनही दिले जाते. बाजारामध्ये कॉटनच्या कापडाला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानात कॉटनच्या कापडाची मोठी रेंज उपलब्ध आहे. कॉटनलाच मागणी असण्याचे कारण म्हणजे टेरीकॉट कापड अंगात घातल्याने चर्मरोग, घाम येणे त्यामुळे ग्राहक कॉटनच्या कापडाला जास्त महत्त्व देतात. किरकोळ बाजारपेठेमध्ये काही दुकानांमध्ये योग्य किंमत आहे.एकच भाव असल्याने ग्राहकांची फसवणूक होत नाही. जिथे भाव होतो तिथे माणूस नक्कीच फसतो. - आप्पासाहेब बोबडे, ग्राहक, जयरामनगर, अमरावती. अमरावतीच्या कापड बाजारात ब्रान्डेड कापड कमी प्रमाणात आहे. मोठमोठ्या शोरुम लागायला पाहिजेत. ग्राहक उच्च प्रतीचे कापड खरेदी करतील. त्यात त्यांचाही फायदा होईल.- आशीष मालू, जयरामनगर, अमरावतीग्राहकांचा विश्वास, प्रेम आणि जिव्हाळा या आधारावर आमचा व्यवसाय सुरु आहे. तसेच कापडाची अमरावती मंडी जुनी असल्याने ग्राहक येथे येतात. - राजेंद्र गगलानी, पदाधिकारी, अमरावती किरकोळ कपडा व्यापारी संघकपड्याची रेंज अमरावती कापड बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु पाहिजे तशी उलाढाल होत नाही. यासाठी काही तरी केले पाहिजे.- राजू केडिया, उपाध्यक्ष, अमरावती रिटेल कपडा असोसिएशन,