शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
4
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
5
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
6
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
7
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
9
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
10
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
11
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
12
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
13
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...
15
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
16
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
17
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
18
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
19
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
20
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई

१२० गणेश मंडळांत पोलिसांनी केली आरती

By admin | Updated: September 12, 2016 00:10 IST

जातीय सलोखा राहण्याच्या उद्देशाने पोलिसांनी शहरातील तब्बल १२० सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणपतीची आरती केली.

जातीय सलोखा राखण्याचा उद्देश : पोलीस आयुक्तांची लोकाभिमुख संकल्पनाअमरावती : जातीय सलोखा राहण्याच्या उद्देशाने पोलिसांनी शहरातील तब्बल १२० सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन गणपतीची आरती केली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची ही संकल्पना अमरावतीकरांसाठी विशेष आकर्षण ठरली आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात तब्बल ५४४ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. गणेशोत्सवाचा उत्साह व आनंद साजरा करीत असताना नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या दृष्टीने पोलिसांनी हे आगळे-वेगळे पाऊल उचलले आहे. पोलीस व जनतेमध्ये सौहार्दपूर्ण संबध निर्माण व्हावे व जातीय सलोखा रहावा, अशी संकल्पना पोलीस आयुक्त मंडलिक यांची होती. त्या अनुषंगाने शहरातील सार्वजनिक गणेश मंडळातील पदाधिकारी, गणेशभक्त व संबमधीत पोलीस ठाण्यात सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदारांमार्फत गणपतीची आरती व पूजा आयोजित करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार १० सप्टेंबर रोजी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२० गणेश मंडळांना भेटी देऊन गणपतीची आरती व पूजा केली. यामध्ये राजापेठ १७, कोतवाली ११, खोलापुरी गेट १२, भातकुली १०, फे्रजरपुरा ११, बडनेरा १०, नांदगाव पेठ १०, गाडगेनगर १८, वलगाव १२ व नागपुरी गेट ९ या गणेश मंडळांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)महादेवखोरीतील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटपगणेश मंडळांना भेटी देऊन पूजा व आरती करण्याचा उपक्रम पोलिसांनी यंदा राबविला असून सोबतच महादेव खोरी परिसरातील शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाद्वारे गरीब व गरजू २५ विद्यार्थ्यांना पुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप केले.