शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत एका दिवसात १२ पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 19:30 IST

अमरावती येथील क्लस्टर हॉटस्पॉट व्यतिरिक्त शहराच्या इतरही भागात कोरोनाचा शिरकाव झाला. गुरुवारी दिवसभरात १२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात आता समूह संक्रमणाची भीती व्यक्त होत आहे. अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४० वर पोहचली आहे.

ठळक मुद्देसात मृत, चार कोरोनामुक्त, २९ रुग्णांवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील क्लस्टर हॉटस्पॉट व्यतिरिक्त शहराच्या इतरही भागात कोरोनाचा शिरकाव झाला. गुरुवारी दिवसभरात १२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात आता समूह संक्रमणाची भीती व्यक्त होत आहे. अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४० वर पोहचली आहे. यात ७ मृत, ४ कोरोनामुक्त, तर २९ व्यक्तींवर येथील कोविड रुग्णालयात उपचार सरू आहे.येथील क्लस्टर हॉटस्पॉटमधील खोलापुरी गेटभागात बाधितांच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन करण्यात आलेल्या तीन महिला व दोन पुरुष, कंवर नगरातील दोन महिला व एक पुरुष, हनुमान नगरातील एक महिला तसेच नालसाबपुरा भागातील दोन महिला व एका व्यक्तीचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आलेला आहे. २३ एप्रिल रोजी शहरात ९ कोरोनाग्रस्त होते, तर ३० एप्रिलला बाधितांची संख्या ४० झालेली असल्याने एका आठवड्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ३१ ने वाढली आहे. यामुळे शहरात कोरोनाचा आता गुणाकार सुरू झालेला आहे. यामुळे चिंता वाढली आहे.२९४ स्वॅब अहवाल प्रलंबितअमरावती जिल्ह्यातील १२२१ संशयितांचे थ्रोट स्वॅब नागपूर, अकोला व सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले आहेत. यापैकी ४० पॉझिटिव्ह, तर ९०० निगेटिव्ह आलेले आहेत. अद्यापही २७४ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. काही नमुने नाकारण्यात आलेले आहेत. प्रलंबित नमुन्यांमध्ये किमान १०० अहवाल हायरिस्कचे असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस