शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील पाणी पिल्याने ११ बकऱ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:31 IST

तालुक्यातील बोरी गावातील सज्जू नंदा जामूनकर या आदिवासी शेतकऱ्याच्या ११ बकºया तलावातील पाणी पिल्याने दगावल्या. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने तलावाच्या पाण्यामध्ये विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देबोरी येथील घटना : पाण्यात विष टाकल्याचा संशय

धारणी : तालुक्यातील बोरी गावातील सज्जू नंदा जामूनकर या आदिवासी शेतकऱ्याच्या ११ बकऱ्या तलावातील पाणी पिल्याने दगावल्या. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने तलावाच्या पाण्यामध्ये विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.बोरी गावातील सज्जू जामुनकर या आदिवासी शेतकऱ्यांचा मुलगा मुकेश (१३) शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बकऱ्यांना पाणी पाजण्याकरिता जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाच्या तलावाशेजारी घेऊन गेला होता. बकऱ्या तलावाच्या काठाकाठाने चरल्यानंतर पाणी पिण्यासाठी तलावाकडे वळल्या. पाणी पिल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत एकापाठोपाठ सर्वांनीच माना खाली टाकून जमिनीवर लोळायला सुरुवात केली. काही वेळातच त्या दगावल्या. मुकेशने घडलेल्या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. त्यांनी लगेच तलावाकडे धाव घेतली ते पोहोचेपर्यंत सर्व बकऱ्या दगावल्या होत्या. सज्जू जामुनकर यांनी धारणी पोलिसांत शनिवार दुपारी तीनच्या तीन वाजताच्या दरम्यान तक्रार नोंदवली. पोलिसांनी तलावावर जाऊन चौकशी केली. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. रविवारी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तलाव ठिकाणी जाऊन बकºयांची पाहणी केली. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत बकऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.तलावाशेजारी वन्यप्राण्यांचा वावरलघु सिंचन विभागाचा हा तलाव वनविभागाच्या जंगलाशेजारी वसलेला आहे. त्यामुळे या तलावावर पश्चिम मेळघाट वनविभागांतर्गत येणाऱ्या जंगलातील वन्यप्राणीसुद्धा तहान भागविण्याकरिता येतात. कदाचित त्या वन्यप्राण्यांच्या हत्येकरिता तलावात विषप्रयोग झाला नसेल ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने वनविभागाचे अधिकारी, कर्मचारीसुद्धा जंगलात जाऊन तपास कामाला लागले आहेत.

टॅग्स :WaterपाणीDeathमृत्यू