शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

११ जणांनी अनुभवले मरण आपुल्या डोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:01 IST

चांदूर रेल्वे तालुक्यात दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसवामुळे नद्या फुगल्या. पाच वर्षांपासून तालुकावासीयांनी नदीला पूर पाहिला नव्हता. मात्र, अचानक  या नद्या   ओव्हर फ्लो झाल्या. धानोरा  म्हाली-पळसखेड  मार्गावर खोलाड नदी येते. या नदीला   बुधवारी पूर आला. दुभंगलेल्या पात्रात पुरामुळे अडकलेल्या ग्रामस्थांना गावाकडे जाण्यासाठी मार्ग नव्हता. पूरपातळी वाढल्यास त्यांच्या जिवावर बेतण्याचीही शक्यता होती.

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : अचानक आलेला पूर... त्यात जिवंत राहणार की नाही, याची शाश्वती नाही... पण कोणी तरी आपल्या मदतीला नक्की धावणार आहे, हे मनाशी ठरवून प्रत्येकाने आपले मित्रपरिवाराला फोन केले, संदेश दिले. अखेर खुद्द लोकप्रतिनिधीच मदतीला आले. चांदूर रेल्वे तालुक्यातील एकपाळा, पळसखेड, धानोरा म्हाली येथील ११ जणांनी आपल्या  डोळ्यांनी स्वतःचे मरण अनुभवले नि थोडक्यात बचावलेदेखील.  चांदूर रेल्वे तालुक्यात दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसवामुळे नद्या फुगल्या. पाच वर्षांपासून तालुकावासीयांनी नदीला पूर पाहिला नव्हता. मात्र, अचानक  या नद्या   ओव्हर फ्लो झाल्या. धानोरा  म्हाली-पळसखेड  मार्गावर खोलाड नदी येते. या नदीला   बुधवारी पूर आला. दुभंगलेल्या पात्रात पुरामुळे अडकलेल्या ग्रामस्थांना गावाकडे जाण्यासाठी मार्ग नव्हता. पूरपातळी वाढल्यास त्यांच्या जिवावर बेतण्याचीही शक्यता होती. त्यामुळे काही जणांनी आमदार प्रताप अडसड व सामाजिक कार्यकर्त्या अर्चना रोठे यांच्याशी बुधवारी सायंकाळी ७ वाजता संपर्क साधला.  मतदारसंघात दौऱ्यावर असलेले आमदार प्रताप अडसड यांनी पळसखेड  परिसरात पोहोचून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून त्वरित ही रेस्क्यू टीमला पाचारण केले आणि या पुरात अडकलेल्या तब्बल आठ प्रवाशांना प्रथम जीवदान दिले. 

संगमाहून तिघांना काढलेखोलाड, रायगड व धानोरी या नद्यांचा एकपाळाजवळ त्रिवेणी संगम आहे. एकपाळा येथील विनोद काळमेघ, गणेश काळे, हरीश गोहत्रे हे श्रावणात  ४० दिवस पुरातन महादेवाच्या मंदिरात मुक्कामी असतात. रात्री ११ वाजता अचानक त्रिवेणी संगम असलेल्या  खोलाड नदीसोबतच रायगड आणि धानोरी नद्यांना पूर आला. त्यामुळे या मंदिरातून बाहेर पडणे तिघांना अशक्य झाले. विनोद काळमेघ यांनी आमदार प्रताप अडसड यांच्याशी संपर्क साधला. रेस्क्यू टीमने या तीनही भाविकांना गुरुवारी पहाटे ६ वाजता बाहेर काढले. या तिघांच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी आले होते. साक्षात मृत्यू त्यांच्यापुढे होता. 

मागील चार ते पाच दिवसांपासून पाऊस संततधार होता. अशावेळी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य तसेच त्यांच्या संरक्षणाची काळजी घेणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. ते मी पार पाडले आहे. - प्रताप अडसड, आमदारधामणगाव विधानसभा मतदारसंघ

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर