शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

बडनेरा येथून ११ लाखांचा खतसाठा जप्त

By admin | Updated: May 24, 2014 23:11 IST

खरीप हंगामाच्या तोंडावरच चार विविध कंपन्यांचा अंदाजे ११ लाख ७७ हजार रूपये किमतीचा अप्रमाणित खतसाठा कृषी विभागाच्या भरारी पथकाने बडनेरा येथील तीन कृषी सेवा केंद्रांच्या गोडाऊनमधून शनिवारी जप्त केला.

कृषी विभागाची कारवाई : रासायनिक खतांच्या तीन हजार बॅगा जप्त

अमरावती : खरीप हंगामाच्या तोंडावरच चार विविध कंपन्यांचा अंदाजे ११ लाख ७७ हजार रूपये किमतीचा अप्रमाणित खतसाठा कृषी विभागाच्या भरारी पथकाने बडनेरा येथील तीन कृषी सेवा केंद्रांच्या गोडाऊनमधून शनिवारी जप्त केला.

खरीप हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना बाजारपेठेत अप्रमाणित रासायनिक खते व बोगस बियाण्यांची घुसखोरी सुरु झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने धडक मोहिम आरंभली आहे. आरएम फॉस्फेट अँन्ड केमिकल्स धुळे या कंपनीकडून बाजारपेठेत विपनण करणार्‍या श्रीराम फर्टीलायझर अँन्ड केमिकल्सकडून २00 बॅग, बीईसी फर्टीलायझर, पुलगाव या कंपनीच्या १६0 बॅग, मध्यभागात फॉस्फेट लि. मध्यप्रदेश या कंपनीचे विपणन करणार्‍या श्रीराम फर्टीलायझरमधून ३२0, आरसी फर्टीलाझर प्रा.लि. नाशिक या कंपनीचे ३00 बॅग आणि दत्त अँग्रो सर्विस प्रा.लि. जळगाव खान्देश या कंपनीच्या सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) १९४0 बॅग जप्त करण्यात आल्या. कृषी विभागाच्या भरारी पथकाने एसएसपी कंपनीच्या रासायनिक खतांची गुणवत्ता पडताळणी केली असता हे रासायनिक खत अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले. या अप्रमाणित खताचा मोठा साठा बडनेरा येथील महावीर कृषी सेवा केंद्र, कृषी आनंद सेवा केंद्र आणि कृषी सेवा केंद्र, बडनेरा यांच्या गोडाऊनमधून कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला. या प्रकरणी दोषी कंपन्यांविरुध्द फर्टीलायझर कंन्ट्रोल ऑर्डर १९९५ च्या कलम १९ अ नुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई कृषी सेवा संचालक अशोक लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय तंत्र अधिकारी जी.टी. देशमुख, जिल्हा कृषी विकास अधिकारी दिलीप काकडे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी पुरुषोत्तम कडू, कृषी अधिकारी डी.ए. पतंगराव यांनी केलीे. या कारवाईचा अहवाल सोमवारी जिल्हाधिर्‍यांना सादर केला जाईल.