शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

११ लाख २० हजारांचा गुटखा जप्त; एफडीए, पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 18:33 IST

अन्न व औषधी प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकून दोन व्यापारी प्रतिष्ठानांच्या गोदामातून तब्बल ११ लाख २० हजार ९२५ रुपयांचा गुटखा मंगळवारी दुपारी जप्त केला. 

अमरावती : अन्न व औषधी प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकून दोन व्यापारी प्रतिष्ठानांच्या गोदामातून तब्बल ११ लाख २० हजार ९२५ रुपयांचा गुटखा मंगळवारी दुपारी जप्त केला.      चार दिवसांपूर्वीच न्यू ईगल सेल्स या प्रतिष्ठानातून गुटखा जप्त करण्यात आला. राजकुमार मोटवानी हे न्यु ईगलचे संचालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुन्हा त्याच प्रतिष्ठानाच्या गोदामातून हा गुटखा जप्त करण्यात आला. सोबतच मंगळवारी मां शारदा रिचार्ज या प्रतिष्ठानात खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले असून या दोन्ही प्रतिष्ठानांचे परवाने रद्द करावे, असे पत्र पोलीस विभागाने एफडीएला दिले आहे. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव व एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी वाकडे यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास न्यु ईगल सेल्स व मां शारदा रिचार्ज या दोन प्रतिष्ठानांत धाड टाकली. त्यावेळी गुटखा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी प्रतिष्ठानाची झडती घेतली असता प्रतिष्ठानासह गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. एफडीए अधिकाºयांनी तो माल जप्त केला. मां शारदा रिचार्जमध्ये मोबाईल सिम रिचार्जसोबतच खाद्यपदार्थांचीही विक्री केली जात होती. ही बाब नियमबाह्य असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सलग दोनवेळा तेथे गुटखाजन्य पदार्थ आढळल्याने या प्रतिष्ठानाचे परवाने रद्द करावे, असे पत्र पोलिसांनी एफडीएला दिले आहे. 

तनवीर आलमचा हस्तक्षेप कसा ?गुटखा मालाचा पदार्फाश झाल्यानंतर तेथे सामाजिक कार्यकर्ते तनवीर आलम पोहोचले. त्यांनीही गुटखा माल लपविलेल्या जागा पोलिसांना दाखविल्या. त्यामुळे प्रतिष्ठान संचालकाने आक्षेप घेत तनविर आलम यांचा गुटखा विक्रीसंदर्भात हस्तक्षेप कसा, असा प्रश्न निर्माण केला.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस