शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

१०४ कंत्राटी प्राध्यापकांची होणार भरती, केंद्रीय अनुदान आयोगाचे नियमावली लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 22:21 IST

व्यवस्थापन परिषदेचा निर्णय : केंद्रीय अनुदान आयोगाचे नियमावली लागू

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठातील विविध शैक्षणिक पदव्युत्तर विभागात रिक्त असलेल्या कंत्राटी प्राध्यापकांच्या १०४ जागांकरिता पदभरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. सोमवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अनुदान आयोगाच्या निकष आणि नियमानुसार पदभरती केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख, शिक्षण मंचचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप खेडकर आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठ प्रशासनाकडून कंत्राटी वजा ११ महिन्यांच्या ठरावीक कालावधीसाठी प्राध्यापकांच्या नियुक्तीचा विषय चर्चिला गेला. २४ हजार रुपये एकत्रित मानधनावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय झाला. मात्र, प्राध्यापकांची नियुक्ती करतेवेळी यूजीसीच्या नियमानुसार ज्यांच्याकडे नेट-सेट, पीएच.डी पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. प्रसंगी पात्र उमेदवार मिळाले नाहीत, तर पदव्युत्तर पदवी आणि ५५ टक्के गुण असल्यास संबंधितांची नियुक्ती करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.

यूजीसी, एआयसीटीई, एनसीटी या शिखर संस्थांनी ठरविलेल्या शैक्षणिक अटीनुसार प्राध्यापकांची भरती राबविली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट के ले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ अन्वये कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती करताना निवड समिती ठरवून दिली आहे. मात्र, नेट-सेट, पीएच.डी.ची अट वगळू नये, अशी मागणी दिनेश सूर्यवंशी, नीलेश गावंडे, प्रसाद वाडेगावकर या सदस्यांनी केल्याची माहिती आहे.       यूजीसीच्या नियमांनीच प्राध्यापक पदभरती होईल. या पदभरतीने प्राध्यापकांना न्याय मिळेल. मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबेल.    - मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठTeacherशिक्षक