शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एका एकरात दहा लाखांचे टोमॅटो;  शेतकरी अतुल लकडे यांची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:40 IST

पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठ मागणीनुसार शेतीतून १०० दिवसांत एका एकरात १० लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे.

अचलपूर : पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठ मागणीनुसार शेतीतून १०० दिवसांत एका एकरात १० लाखांपेक्षा अधिक टोमॅटोचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. ही किमया अचलपूरच्या अब्बासपुरा येथील अतुल लकडे या शेतक-याने साधली आहे. अब्बासपुरा अचलपूर येथील युवा शेतकरी अतुल पुरूषोत्तमराव लकडे (३० वर्षे) यांनी यावर्षी एका एकरात टोमॅटोची लागवड केली. साधारणत: जुलै महिन्यात टोमॅटो बियाणे आणून रोपे तयार करून शेतात झिकझॅक पद्धतीने मल्चिंग टाकून लागवड केली. ५ फूट बाय २ बेड अशा पद्धतीने साधारणत: दीड फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. तसेच ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे व खताचे नियोजन केले. ५० टक्के रासायनिक व ५० टक्के सेंद्रिय पद्धतीची औषधे त्यांनी वापरली. सहा वेळा जीवामृत झाडांना दिले तर पांढरी माशी, तुरतुडे यांचा बंदोबस्त करण्याकरिता ५० पिवळे ट्रॅप या टोमॅटोच्या शेतात बसविले होते.या एका एकरात लकडे यांना दोन हजार कॅरेट टोमॅटोचे उत्पादन झाले. परतवाडा, अंजनगाव या बाजारपेठेमध्ये या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी होती. ६५० ते १५०० रूपये प्रति कॅरेट दर लकडे यांना मिळाले. आजही या टोमॅटोचे उत्पादन सुरूच आहे. बी-बियाणेपासून तर मजुरी, फवारणी, खत, टोमॅटोचे झाडे बांधणे, फळे सोडणे, निंदण यासाठी एका एकरात सरासरी दोन लक्ष रूपये खर्च त्यांना आला. खर्च वजा करून अतुल लकडे यांना एका एकरात जवळपास ११ लाखांचे उत्पन्न टोमॅटोने मिळवून दिले. युवा शेतक-यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार तसेच पारंपरिक शेती न करता अत्याधुनिक आधुनिक शेती करावी.- अतुल लकडे,शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीAmravatiअमरावती