शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

१ हजार ७५८ तरुणांची स्वप्नपूर्तीसाठी दौड!

By admin | Updated: March 30, 2016 00:39 IST

पोलीस भरती प्रक्रियेला मंगळवार सकाळपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी शहर, ग्रामीण व एसआरपीएफच्या पोलीस ....

पोलीस भरतीला सुरुवात : धावताना पडल्याने युवकाचा पाय जायबंदीअमरावती : पोलीस भरती प्रक्रियेला मंगळवार सकाळपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी शहर, ग्रामीण व एसआरपीएफच्या पोलीस पदभरतीत १ हजार ७८५ तरुणांनी स्वप्नपूर्तीसाठी दौड लावली. १०० मीटर धाव चाचणी दरम्यान परभणी जिल्ह्यातील युवक अचानक खाली कोसळल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तरुणाला उपचारकरिता तातडीने इर्विन रुग्णालयात पाठविण्यात आले. अमरावती शहर पोलीस विभागातील ३१, ग्रामीण पोलीस विभागातील २७ तर एसआरपीएफमधील ४० जागांसाठी तब्बल ७ हजार ५७२ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.परभणीच्या तरुणाच्या पायाला गंभीर दुखापतपोलीस भरतीत १०० मीटर दौड चाचणीच्यावेळी सर्व तरुण धावत असताना अचानक केशव माधव दुगाने (२४, रा. कानेगाव, ता.सोनपथ, जिल्हा परभणी) हा तरुण खाली कोसळला. यात केशवच्या पायाचे हाड मोडले. ही बाब लक्षात येताच तत्काळ पोलिसांनी केशववर प्राथमिक उपचार सुरू केले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेद्वारे इर्विन रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. परीक्षार्थींना प्राधान्यपोलीस भरती प्रक्रियेदरम्यान परीक्षार्थी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, भरतीच्या तारखेमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे पोलीस विभागाने सांगितले. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पोलीस भरतीदरम्यान आहेत, त्यांनी आधीच पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यास त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन त्यांची चाचणी परीक्षेच्या वेळेपूर्वीच घेतली जाईल किंवा परीक्षा संपल्यानंतरही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यामुळे परीक्षार्थ्यांचे नुकसान टळू शकेल. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.