शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

१ लाखावर नागरिकांची तहान भागविली जातेय टॅंकर, विहिरीवर

By जितेंद्र दखने | Updated: June 17, 2023 16:12 IST

पाणी समस्या : मेळघाटासह गैरआदिवासी भागातील ८८ गावात टंचाई

अमरावती: मेळघाटातील चिखलदरा,धारणी सह गैरआदिवासी भागातील ८८ गावात पिण्याच्या पाण्याचीटंचाई जाणवू लागली आहे. जून महिन्यातही या गावामधील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून ११ गावात १४ टॅंकरने तर ७७ गावांमध्ये ८४ विंधन विहीर व खासगी विहीरव्दारे १ लाख ०९ हजार ८०२ नागरिकांची तहान भागविली जात आहे.

यामध्ये १० हजार १२९ नागरिकांना १४ टॅकरव्दारे तर ७७ गावातील १ लाखावर नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील अनेक गाव आणि वाड्या वस्त्यांवर शासकीय टँकर पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात शासकीय आणि खाजगी टँकरचा समावेश आहे. ८८ गावात पाणी टंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा केला जात आहे. यात चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावात तर चिखलदरा तालुक्यामधील १० गावात १४ टॅक़रने पाणी पुरवठा केला जात आहे. तर ११ तालुक्यातील २६ गावात विंधन विहीर तर ५८ खाजगी विहीरीव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.

या गावात टॅंकरने पाणी पुरवठाचांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर,चिखलदरा मधील आकी,मोथा,खोंगडा,रायपूर,साेमवारखेडा,बगदरी,धरमडोह,खडीमल,एकझिरा,गौलखेडा बाजार आदी११ गावात टॅकरव्दारे तहान भागविली जात आहे.तालुकानिहाय विहिर अधिग्रहाणाचे गावेअमरावती ०९,नांदगाव खंडेश्र्वर १५,भातकुली ०१, तिवसा ०४,मोर्शी ०८,वरूड ०४,चांदूर रेल्वे १२,अचलपूर ०३,चिखलदरा १७,धारणी ०३,धामनगांव रेल्वे ०१ अशा १४ पैकी ११ तालुक्यातील ७७ गावात विहीर अधिग्रहणाव्दारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.जिल्ह्यातील मेळघाटसह ११ तालुक्यातील जवळपास ८८गावात पाणी टंचाई निवारणार्थ पाणी पुरवठा विभागाने १४ टॅकर व ८४ विहीरचे अधिग्रहन केलेले आहे.या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांना सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे गतवर्षी पेक्षा यंदा टॅकरची संख्या बरीच घटली आहे.संदीप देशमुखकार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग

टॅग्स :water shortageपाणीकपात