शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

अखेर जिल्हा परिषदेचे आरक्षण ठरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:48 IST

सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसह नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासह महिलांसाठी आरक्षित जागांच्या प्रक्रियेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.

अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसह नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गासह महिलांसाठी आरक्षित जागांच्या प्रक्रियेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार एकूण ५३ मतदारसंघांसाठीचे आरक्षण घोषित करण्यात आले असून, अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी ५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (नामाप्र) १४ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी २२ गट आरक्षित करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या ५३ गटांच्या आरक्षणात सर्व संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी ५३ पैकी २७ गट राखीव करण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघांची रचना आणि आरक्षण ३० एप्रिल रोजी घोषित करण्यात आले होते. त्यासंदर्भात काही सर्कलबाबत हरकती व सूचना प्रशासनाकडे सादर करण्यात आल्या होत्या. याबाबतची सुनावणी विभागीय आयुक्तांच्या दालनात होऊन आक्षेप फेटाळण्यात आले. 

 जिल्हा परिषद गटांचे प्रवर्गनिहाय आरक्षण!१२ अनुसूचित जाती गट : सर्वसाधारण - उगवा, वरूर, राजंदा, भांबेरी, कान्हेरी सरप, सस्ती. स्त्रियांसाठी राखीव- व्याळा, पारस, हातरुण, चांदूर, बोरगाव मंजू, हातगाव.०५ अनुसूचित जमाती गट : सर्वसाधारण - पिंपळखुटा, जनुना. स्त्रियांसाठी राखीव- अकोली जहागीर, महान, आगर.१४ नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण - अकोलखेड, लाखपुरी, घुसर, कानशिवणी, अंदुरा, देगाव, शिर्ला. स्त्रियांसाठी राखीव - दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., कुटासा, बपोरी, कुरणखेड, दगडपारवा.अनेकांना झटकाजिल्हा परिषद निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी राखीव जागा ठरतानाच सामाजिक आरक्षणासह सर्वसाधारण गटांतून महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा निश्चित झाल्याने जिल्हा परिषदेच्या राजकारणातील अनेक प्रस्थापित, दिग्गज, सत्ताधारी सदस्यांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. काही पदाधिकारी, सदस्यांना त्यांच्याऐवजी पत्नीला राजकारणात आणण्याची संधी महिलांसाठी राखीव गटांमुळे उपलब्ध झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूक