शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्हा परिषद :योजनांसाठी लाभार्थींची सोडतीद्वारे निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 13:50 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून राबविल्या जाणाऱ्या विविध विभागाच्या योजनांसाठी लाभार्थींची निवड चिठ्ठीद्वारे सोडतीने करण्यात आली.

अकोला : जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून राबविल्या जाणाऱ्या विविध विभागाच्या योजनांसाठी लाभार्थींची निवड चिठ्ठीद्वारे सोडतीने करण्यात आली. त्यामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांचा समावेश आहे. महिला व बालकल्याण विभागाची लाभार्थी यादी लक्ष्यांकापेक्षा अर्ज कमी असल्याने आधीच प्रसिद्ध करण्यात आली. चिठ्ठीद्वारे सोडतीने लाभार्थी निवड करण्याची प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषदेत प्रथमच राबविण्यात आली.जिल्हा परिषदेच्या उपकरातून विविध विभागामार्फत राबविल्या जाणाºया योजनांसाठी प्राप्त अर्जांच्या छाननीतून पात्र अर्जदारांची यादी जिल्हा परिषद इमारतीच्या भिंतीवर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. गुरुवारी चिठ्ठी सोडत पद्धतीने लाभार्थी निवड केली जाईल, असेही ठरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रक्रिया आणि वेळापत्रकही ठरवून त्यानुसार प्रशासकीय स्तरावर मंजुरीपर्यंतची प्रक्रिया वेळेतच पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी विविध विभागांसह पंचायत समित्यांना दिले. त्यानुसार कृषी विभागाकडे असलेल्या ५७ लाख ५० हजारांच्या निधीतून लाभ मिळण्यासाठी तब्बल ४,२७३ अर्ज प्राप्त झाले. पात्र अर्जांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. पात्र अर्जांची संख्या आणि त्या तुलनेत द्यावयाचा लाभ, हे प्रमाण अल्प असल्याने चिठ्ठी सोडतीने निवड करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात राबविण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे व कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे उपस्थित होते. सभागृहात उपस्थित असणारे तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी डोळे बंद करून बरणीतील चिठ्ठ्या उचलल्या. त्यामध्ये असलेल्या नावाची निवड त्या लाभासाठी करण्यात आली.

- तालुकानिहाय निश्चित लाभार्थीशेळीगटासाठी अकोला तालुक्यात पात्र १०६ अर्जांपैकी ८, तेल्हारा-२७ पैकी ५, पातूर १६ पैकी ५, बार्शीटाकळी ८१ पैकी ५, बाळापूर ६ पैकी ५ अकोट ३४ पैकी ७, मूर्तिजापूर २८ पैकी ७ लाभार्थींची निवड झाली आहे. गोठा बांधणीसाठी तेल्हारा-३, मूर्तिजापूर ११ पैकी ४, बाळापूर १० पैकी ३, अकोट ३२ पैकी ४, अकोला ४९ पैकी ५ लाभार्थींची निवड झाली. बोकूड वाटपासाठी ८२ पात्र लाभार्थींपैकी ७० जणांची निवड करण्यात आली. सोबतच डीझल पंप पाच एचपीसाठी २६४, ओपनवेल सबमर्सिबल पंप-५५९, पाच एचपी सबमर्सिबल-१८७, प्लास्टिक ताडपत्री-३६८, प्लास्टिक ताडपत्री-१८९९, एचडीपीई पाइप-६५२, स्पायरल सेपरेटर-३४४ अर्जांतून लाभार्थी निवड करण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद