शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारली बचत बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 16:11 IST

आदिवासी पाड्यातील सावरखेड जिल्हा परिषद शाळेत बचत बँक सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे कामकाज विद्यार्थीच सांभाळत असून, ३२ खातेदार आहेत. शाळेतील एक खिडकी बँकेप्रमाणे करण्यात आली आहे. खातेदार चिमुकल्यांची पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी रांग लागते.

- संतोषकुमार गवई  लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : बालपणापासून बचतीची सवय लागावी यासाठी सावरखेड जिल्हा परिषद शाळेत बाल बचत बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे कामकाज विद्यार्थीच सांभाळत असून, ३२ खातेदार आहेत.विद्यार्थ्यांना बचत करण्याची सवय लागावी या हेतूने दुर्गम आदिवासी पाड्यातील सावरखेड जिल्हा परिषद शाळेत बचत बँक सुरू करण्यात आली आहे. या बँकेच भागभांडवल २ हजार रुपये आहे. व्यवहारासाठी प्रत्येकाचे स्वतंत्र पानावर व्यवहार लिहिला जातो. शाळेतील एक खिडकी बँकेप्रमाणे करण्यात आली आहे. खिडकीच्या पलीकडे इयत्ता चौथीतील शिवाणी अवधूत देवकर ही रोखपाल म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडत आहे. बँकेचे व्यवहार दर शनिवारी होत असल्याने खातेदार चिमुकल्यांची पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी रांग लागते. या पैशातून विद्यार्थी वही, पेन इत्यादी साहित्य खरेदी करतात. त्यामुळे त्यांना बालपणापासून बचतीची सवय झाली आहे. त्याबरोबरच बँकिंगचे व्यवहार बालपणात समजू लागले आहेत. प्रयोगातून विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा, असा या येथील दोन शिक्षकांचा उद्देश आहे. शाळा मुख्याध्यापक डी. के. पडघन, सहायाक शिक्षककैलास पडघन अनेकविध उपक्रम राबवत आहेत.

बचतीची लागली सवयआदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करून उपजीविका भागवतात. ही मुले खाऊसाठी मिळालेले पैसे बँकेत टाकतात. तसेच शालेय साहित्य खरेदीसाठी या पैशांचा वापर करतात. या व्यहारातून त्यांना पैशांची बचत करण्याची सवय लागली आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाbankबँकStudentविद्यार्थी