शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपीसी’त निवडीसाठी अकोला जिल्हा परिषदेत फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:29 IST

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघातून चार रिक्त पदांवर सदस्यांची निवड होणार आहे. त्यातील तीन पदांवर नैसर्गिक न्यायाने निवडीचा पर्याय आहे; मात्र एका पदावर निवड होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. जिल्हा परिषदेतील पक्षांच्या परस्पर समन्वयाने या पदांसाठी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देमृत्यूमुळे रिक्त तीन जागांसाठी नैसर्गिक न्यायाचे तत्त्व

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघातून चार रिक्त पदांवर सदस्यांची निवड होणार आहे. त्यातील तीन पदांवर नैसर्गिक न्यायाने निवडीचा पर्याय आहे; मात्र एका पदावर निवड होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. जिल्हा परिषदेतील पक्षांच्या परस्पर समन्वयाने या पदांसाठी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीच्या १४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद मतदारसंघातून चार, महानगरपालिका मतदारसंघातून सात व नगरपालिका मतदारसंघातून तीन सदस्यांची निवड करण्यासाठी २९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी आहे. त्यासाठी गेल्या दोन दिवसांत जिल्हा परिषद मतदारसंघातून एकही अर्ज दाखल झाला नाही; मात्र अर्ज भरण्यासाठीची चर्चा सदस्यांमध्ये सुरू झाली आहे. जिल्हा परिषद मतदारसंघातील चारपैकी तीन पदे सदस्यांच्या मृत्यूमुळे रिक्त झाली आहेत. त्यामध्ये हातगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे रवींद्र गोपकर, सिरसो मतदारसंघाचे गजानन गावंडे, दानापूर मतदारसंघाचे राजेश खोणे यांच्या निधनाने नियोजन समितीतील तीन राखीव पदे रिक्त झाली, तर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांची अध्यक्षपदी निवड झाली. नियोजन समितीमध्ये त्या पदसिद्ध उपाध्यक्ष असल्याने त्यांची राखीव पदाची जागा रिक्त झाली. त्यासाठी आता निवडणूक होत आहे. 

नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर एकमत जिल्हा परिषद सदस्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडीसाठी नैसर्गिक न्यायाचे तत्त्व पाळल्या जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या गोपकर यांच्या जागेवर सम्राट डोंगरदिवे, अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या खोणे यांच्या जागेवर त्यांचा मुलगा श्रीकांत खोणे, इतर मागासवर्गासाठी राखीव असलेल्या गावंडे यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी अहिल्या गावंडे यांची निवड करण्यावर जिल्हा परिषद सदस्यांचे एकमत होऊ शकते. त्यामध्ये दोन भारिप-बमसं, एक भाजपचा सदस्य राहणार आहे.

 एका जागेसाठी रंगणार चुरससंध्या वाघोडे यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याने इतर मागासवर्गासाठी रिक्त असलेल्या पदासाठी अनेक सदस्यांमध्ये चुरस वाढणार आहे. त्या पदावर समस्या मांडणारा, विकास निधीसाठी भांडणार्‍या जिल्हा परिषद सदस्यांची निवड व्हावी, असा मतप्रवाह आहे. तशी चर्चाही भारिप-बमसंच्या नेत्यांमध्ये सुरू असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरzpजिल्हा परिषद