शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

जिल्हा परिषद निवडणूक : आता जात वैधतेसाठी लागणार कस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 14:15 IST

सर्व उमेदवारांना जात वैधता प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेचे ३१ गट, पंचायत समित्यांचे ६२ गण सामाजिक आरक्षणात राखीव झाल्यानंतर त्यामध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव स्वीकारण्याला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे इच्छुकांची ऐनवेळी धांदल उडणार असल्याने सामाजिक न्याय विभागाने ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक नोडल अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी शुक्रवारी सामाजिक न्याय विभागाला पत्र देत ही प्रक्रिया सुरू करण्याचे सांगितले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. निवडणूक आयोगाने ठरविलेल्या आरक्षणानुसार ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणुकीसाठी १८ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याला सुरुवात होईल. राखीव जागांवर नामनिर्देशनपत्र दाखल करतानाच उमेदवारांना जात वैधता समितीकडे प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांच्यापुढे केलेले हमीपत्र सादर करावे लागणार आहे. ही किचकट प्रक्रिया पाहता त्याला बराच वेळ लागतो. तसेच उमेदवारांना आर्थिक, मानसिक त्रासाचाही सामना करावा लागतो; मात्र नेहमीप्रमाणेच प्रस्ताव दाखल करण्याचा गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमातीसाठी ५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (नामाप्र) १४ गट राखीव आहेत. जिल्हा परिषदेच्या ५३ गटांपैकी आरक्षणातील १६ गट महिलांसाठी राखीव आहेत. त्या सर्व उमेदवारांना जात वैधता प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. सोबतच सात पंचायत समित्यांच्या १०६ पैकी ६२ गण राखीव आहेत. त्यामुळे या जागांवर लढणाऱ्या उमेदवारांची किमान संख्या पाचशेपेक्षाही अधिक होणार आहे. त्या सर्वांची प्रस्ताव दाखल करण्याची घाई होणार आहे.या गटांतील उमेदवारांना लागणार पुरावाअनुसूचित जाती गट : सर्वसाधारण- उगवा, वरूर, राजंदा, भांबेरी, कान्हेरी सरप, सस्ती. स्त्रियांसाठी राखीव- व्याळा, पारस, हातरूण, चांदूर, बोरगाव मंजू, हातगाव.अनुसूचित जमाती गट : सर्वसाधारण- पिंपळखुटा, जनुना. स्त्रियांसाठी राखीव- अकोली जहागीर, महान, आगर.नागरिकांचा मागास प्रवर्ग : सर्वसाधारण- अकोलखेड, लाखपुरी, घुसर, कानशिवणी, अंदुरा, देगाव, शिर्ला. स्त्रियांसाठी राखीव- दानापूर, अडगाव बु., तळेगाव बु., कुटासा, बपोरी, कुरणखेड, दगडपारवा.शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय जात वैधता समितीला पत्र दिले. उमेदवार राखीव जागेवर निवडणूक लढवित असल्याच्या हमीपत्रासह प्रस्ताव तहसील स्तरावर घेऊन त्यावर समितीने पुढील कार्यवाही करण्याचे कळविले आहे. या प्रक्रियेत काही बदल झाल्यास तत्काळ माहिती दिली जाईल.-प्रा. संजय खडसे, नोडल अधिकारी, जि.प.निवडणूक.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूक