शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

जिल्हा परिषद रणधुमाळी : भारिप-बमसं हेच मुख्य ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 1:35 AM

सर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ही दुसºया क्रमांकावर होती. त्यामुळे साहजिकच भारिप-बमसं हेच ‘टार्गेट’ राहणार आहे.

राजेश शेगोकार, लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नवे नेतृत्व उदयास येते. जिल्हा परिषदेने अनेक आमदार राज्याला दिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला नेते पदापर्यंत पोहोचविणारी निवडणूक आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असली तरी, या माध्यमातून आमदारांच्याच प्रतिष्ठेची लढाई सुरू झाली आहे. ज्या मतदारसंघाने आमदारांना भरभरून मतांनी निवडून दिले, त्याच मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी आमदारांचा शब्द प्रमाण मानून कार्यकर्त्यांना विजयी करतात का, यावरच आमदारांच्या ताकदीचाही निकाल ठरणार आहे. अकोल्यातील पाच मतदारसंघांपैकी अकोला पश्चिम हा शहरी मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघात एकही जिल्हा परिषदेचे सर्कल येत नाही. उरलेल्या चार विधानसभा मतदारसंघांत जिल्हा परिषदेचे ५३ गट, सात पंचायत समित्यांच्या १०६ गणांचे सदस्य निवडल्या जाणार आहेत. या चारही विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांत भाजप तर बाळापूर या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघातील आमदारांना आपल्या पक्षाचा जि. प. सदस्य निवडून आणण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या सर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ही दुसºया क्रमांकावर होती. त्यामुळे साहजिकच भारिप-बमसं हेच ‘टार्गेट’ राहणार आहे. भाजपचे मिशन-३५ माजी मुख्यमंत्री प्रचारात लोकसभापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळविलेले यश व वंचित बहुजन आघाडीचा ढासळलेला बुरूज पाहता आता भाजपने जिल्हा परिषद निवडणूक हेच लक्ष्य ठेवले असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेवर भाजपने आतापर्यंत झेंडा फडकविला नसल्याने शत-प्रतिशत भाजप हे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी मिनी मंत्रालयाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात घेतलेल्या सभेत खासदार संजय धोत्रे यांनी जिल्हा परिषदेवर हल्लाबोल करीत ‘नवी पाइपलाइन’ टाकण्याची भाषा केली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ४ जानेवारी रोजी अकोल्यात प्रचारासाठी येत असल्याने ही निवडणूक भाजपने गांभीर्याने घेतली आहे, हे स्पष्टच होते. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे हे स्वत: प्रचारात उतरले असल्याने अकोला पूर्व, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार मतदारसंघांत भाजपने यशाचा झेंडा गाडला असल्याने येथून जिल्हा परिषदेत मतांचे भरघोस पीक येईल, या अपेक्षेत भाजपचे नेते आहे.भारिप-बमसंसाठी प्रतिष्ठेची लढत जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंची सत्ता असून, भारिपचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना लक्ष्य करण्यासाठी ना. धोत्रेंनी लोकसभेच्या प्रचारात जिल्हा परिषद निवडणुकीचे आव्हान प्रचारातच दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून विधानसभेच्या आखाड्यातून ‘वंचित’ला पूर्णपणे बाद करण्यात भाजप यशस्वी झाले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारिप-बमसंला टार्गेट केले जात आहे. यावेळी भारिप-बमसंमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली होती. ही बंडखोरी रोखण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकर यांना पॅनल गठित करावे लागले होते. त्यामुळे बंडखोरांची समजूत काढण्यात काही प्रमाणात यश आल्याने भारिप-बमसंच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बराच दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भारिप-बमसंकडे केवळ एकच सत्ता केंद्र ताब्यात होते. त्यामुळे येथील सत्ता टिकविण्याचे आव्हान अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर आहे. भाजपला इशारा...काँग्रेस आघाडीला आशाजिल्हा परिषदेचे मतदार असलेल्या ग्रामीण भागातील चारही मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांना विजयासाठी वंचित बहुजन आघाडीने चांगलेच झुंजविले आहे. भाजपला द्यावी लागलेली झुंज काँग्रेससाठी आशावादी ठरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून मत विभाजन टाळण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दुसरीकडे मूर्तिजापूर तालुक्यात शिवसेनेला सोबत घेत महाविकास आघाडीचा प्रयोगही केला आहे. त्यामुळे या प्रयोगाला किती यश मिळते, यावरच पक्षाचे भविष्य अवलंबून आहे. शिवसेनेच्या स्वबळाची परीक्षाविधानसभा निवडणुकीत भाजपसोबतच्या युतीमध्ये शिवसेनेला एकच जागा मिळाली होती. ती जागा शिवसेनेने जिंकली तर उरलेल्या चार जागांवर भाजपच्या विजयात हातभार लावला. जिल्हा परिषदेत शिवसेना स्वबळावर रिंगणात आहे. त्यामुळे सेनेचे ‘स्वबळ’ किती, याचे मोजमाप यानिमित्ताने होणार आहे. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे जिल्हा परिषदेतून विधानसभेत पोहोचले असून, ते जिल्हाप्रमुखही असल्याने या निवडणुकीत यशापयशाचे बिल त्यांच्याच नावावर फाडले जाणार आहे. सेनेने अकोटमध्ये प्रहाराला सोबत घेऊन मित्रत्व जपण्याचाही संदेश दिला असून, मूर्तिजापुरात काँग्रेससोबत तडजोड केली आहे. त्यामुळे ही निवडणूक सेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ