बोरगाव वैराळे (जि. अकोला) : पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला पराकोटीचा संघर्ष करावा लागत असून, पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका तरूणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना धामणा येथे शुक्रवारी उघडकीस आली. पाण्यासाठी जिल्हयात हा पहिला बळी ठरला आहे. अकोला तालुक्यातील धामणा येथे तीव्र पाण्याची टंचाई आहे. नागरिकांना पाणी मिळावे यासाठी नेरधामणा बॅरेजच्या कंत्राटदाराने येथे लोखंडी टाकी ठेवली आहे. गुरुवारी रात्री गौतम विरघट हा तरुण पाणी भरण्यासाठी तेथे गेला असताना पाण्याच्या टाकीत उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्याला जबर धक्का बसला. उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्कयाने मृत्यू
By admin | Updated: May 21, 2016 03:14 IST