शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अकोटात पोलिसांना हातपाय तोडण्याची धमकी; व्हिडीओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 14:10 IST

अकोट शहरात गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना काही युवकांनी शिविगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ सद्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

ठळक मुद्देकाही युवकांना हटकले असता, या युवकांनी थेट पोलिसांसोबत हुज्जत घातली.लॉकडाउन असताना मोठ्या संख्यने या ठिकाणी जमाव झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

अकोला : कोरोनाचा प्रादूर्भात टाळण्यासाठी संपूर्ण देशात लागू असलेल्या लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांवर विविध ठिकाणी हल्ले होत असल्याच्या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना काही युवकांनी शिविगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ सद्या चांगलाच व्हायरल होत आहे. अकोट शहरातील शौकत अली चौकात तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचाºयांनी लॉकडाउन असताना बाहेर फिरणाºया काही युवकांना हटकले असता, या युवकांनी थेट पोलिसांसोबत हुज्जत घातली. एवढेच नव्हे, तर पोलिसांना शिविगाळ करत हे युवक पोलिसांना पाय तोडून हातात देऊ, अशी धमकीही देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पोलिस दारू पिऊन असल्याचा या तरुणांचा आरोप आहे. अकोटातील शौकत अली चौकाजवळच्या अमीनपुरा भागातील हा व्हिडीओ २४ मे रोजीचा असल्याचे समजते. लॉकडाउन असताना मोठ्या संख्यने या ठिकाणी जमाव झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या परिसरात पुन्हा दिसले, तर परिणाम भोगण्यास तयार राहा, असा निर्वाणिचा इशाराच हे युवक पोलिसांना देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सद्या हा व्हिडीओ चांगलाच व्हारयरल होत आहे. या प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यात आली नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटPoliceपोलिस