शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रक्तरंजीत धुळवड ; अकोल्यात युवकाची धारदार शस्त्रांनी हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 13:46 IST

अकोला - मोठी उमरी परिसरातील देशी दारुच्या दुकानासमोर लहान उमरीतील रहिवासी हरीश उर्फ गणेश शत्रुघ्न भातुलकर या २३ वर्षीय युवकाची पुर्व वैमनस्यावरुन धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केल्याची घटना धुळवडीच्या सायंकाळी घडली.

अकोला - मोठी उमरी परिसरातील देशी दारुच्या दुकानासमोर लहान उमरीतील रहिवासी हरीश उर्फ गणेश शत्रुघ्न भातुलकर या २३ वर्षीय युवकाची पुर्व वैमनस्यावरुन धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केल्याची घटना धुळवडीच्या सायंकाळी घडली. तर हरीषला वाचविण्यासाठी गेलेल्या शुभमवरही या तीन मारेकऱ्यांवर हल्ला चढविल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासोबतच आकोट फैलमध्ये दोन गटात हाणामारी, बाळापूर रोडवर पुण्यातून अकोल्यात आलेल्या एका युवकावर दोघांनी प्राणघातक हल्ला चढविल्याच्या घटणा घडल्याले जिल्हयात धुळवडीला गालबोट लागले आहे.मोठी उमरी परिसरातील २३ वर्षीय हरीश शत्रुघ्न भातुलकर हा त्याचा मीत्र शुभम बोरकर याच्यासोबत मोठी उमरीतील देशी दारुच्या दुकानासमोर रंगपंचमी उत्सव साजरा करीत असतांना त्यांच्याच ओळखीतील गणेश निंभोकार, सागर घाटे व श्रीकांत उर्फ बाबू पाटणकर हे तिघे जन तीथे आले आणि पुर्व वैमनस्यावरुन वाद घालत या तिघांनी हरीष भातुलकर याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला सुरु केला. या तिन मारेकऱ्यांमधील गणेश निंभोकार याने हरिषच्या पाठीवर चाकूने सपासप वार केल्याने हरीष गंभीर जखमी झाला होता. त्यामूळे शुभम बोरकर याने मध्यस्थी करीत हरीषला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र या तीन मारेकऱ्यांना शुभमवरही चाकुन हल्ला चढविल्याने तो गंभीर जखमी होउन खाली कोसळला, त्यानंतर या तीनही मारेकºयांनी पुन्हा हरीष भातुलकरवर हल्ला चढवीला, मात्र परिसरातील नागरिकांनी आरडा-ओरड करताच हे मारेकरी घटनास्थळावरुन पळून गेले, त्यानंतर सिव्हील लाईन्स पोलिसांनी घटनास्थळ गाठले, गंभीर जखमी असलेल्या हरीषला नागरिकांच्या साहायाने तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, उपचारादरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान हरीषचा मृत्यू झाला. तर त्याचा मीत्र शुभमवर उपचार सुरु असून त्याची प्रकृतीही गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी गणेश निंभोकार, सागर घाटे व बाबू पाटणकर या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३०७ नुसार खुन आणि प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तीनही मारेकºयांचा शोध सुरु केला असून तिघेही फरार झाले आहेत. सिव्हील लाईन्स पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा तसेच महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सीक व्हॅनही दाखल झाली होती.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी