शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून पोळपाट डोक्यात घालून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:01 IST

संतप्त झालेल्या दुसºया मित्राने डोक्यात पोळपाट घालून एका त्याची निर्घुण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एमआयडीसी क्रमांक ११ मध्ये घडली.

अकोला: सोबत दारू प्राशन करीत असताना, एका मित्राने दुसऱ्या मित्राला गमतीने शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या दुसºया मित्राने डोक्यात पोळपाट घालून एका त्याची निर्घुण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एमआयडीसी क्रमांक ११ मध्ये घडली. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सुनील त्रिचंद पालवे(२६) याला अटक केली आहे.मोलमजूरी करण्यासाठी येथून राजुशंकर ओंकार सालवे(२४ रा. साजनी, जि. बुरहानपूर)आणि सुनील त्रिचंद पालवे(२६ रा. गोंदरी जि. बुरहानपूर) मध्य प्रदेश दोघे मित्र अकोल्यातील एमआयडीसी भागात आले. येथील एका दालमिलमध्ये काम करून दोघेही परिसरात भाड्याने घेऊन राहायचे. दोघे नेहमी सोबत कामावर जायचे. सोबत जेवण करायचे. दोघेही एकमेकांचे जीवलग मित्रच होते. रविवारी सायंकाळी दोघेही सोबत दारू प्यायला गेले. तेथून परत घरी आले. काही वेळ थांबल्यानंतर राजुशंकर सालवे हा पुन्हा दारू पिण्यासाठी बाहेर गेला. काही वेळाने तो परत आल्यानंतर दोघांनी जेवण करण्यास सुरूवात केली. जेवण करीत असताना, राजुशंकर सालवे हा सुनील पालवे याच्यासोबत थट्टामस्करी करीत होता. दरम्यान त्याने गंमतीने सुनील पालवे याला शिवीगाळ केली. ही शिवीगाळ सुनील पालवे याला जिव्हारी लागल्याने, त्याने, जवळच असलेल्या लाकडी पोळपाट राजुशंकरच्या डोक्यात घातला. यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर आरोपी सुनील पालवे हा घटनास्थळावरून पसार झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी राजुशंकरला उचलून तातडीने सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध केला. नाकाबंदी करून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMurderखूनAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ