नागद येथील पूर्णा नदीत युवक वाहून गेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:28 AM2020-10-10T11:28:14+5:302020-10-10T11:28:21+5:30

Youth drowned in Purna river निशांत गंगाराम मोर्डे(२२) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

Youth drowned in Purna river at Nagd! | नागद येथील पूर्णा नदीत युवक वाहून गेला!

नागद येथील पूर्णा नदीत युवक वाहून गेला!

Next

लोहारा: बाळापूर तालुक्यातील नागद येथील युवक शेतात जात असताना युवकाचा पाय घसरून तोल जाऊन नदीत पडल्याने तो वाहून गेल्याची घटना ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
स्थानिक रहिवासी निशांत गंगाराम मोर्डे(२२) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. हा युवक ९ आॅक्टोबर रोजी सकाळी शेतात कामाला जात असताना, त्याचा पाय घसरून तो नदी पात्रात कोसळला. नदीतील पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने तो युवक नदीच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच उरळचे ठाणेदार विलास पाटील घटनास्थळी पाहोचले. त्यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण केले. पथकासह ग्राम प्रशासन व नागरिकांनी नदी परिसरात शोध मोहीम सुरू केली; परंतु युवक सापडला नाही. सायंकाळी अंधार झाल्याने शोध मोहिमेत अडचण निर्माण झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. शनिवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात येणार असल्याचे संत गाडगेबाबा बचाव पथकाचे अंकुश सदाफळे यांनी सांगितले.

 

Web Title: Youth drowned in Purna river at Nagd!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.