शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 11:01 IST

Crime News ३० वर्षीय महिलेने गावातील नीलेश तारिंगे (वय २७) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

ठळक मुद्देगुन्हा दाखल झाल्याची माहिती युवकाला समजताच, तो व्यथित झाला. बदनामी होईल या भीतीने युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तणावाची परिस्थिती पाहता, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बाळापूर : तालुक्यातील गोरेगाव बु. येथील एका महिलेच्या तक्रारीनुसार बाळापूर पोलिसांनी २७ वर्षीय युवकाविरुद्ध शुक्रवारी लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामुळे व्यथित झालेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यामुळे गावात तणाव निर्माण झाल्याने, बाळापूर पोलिसांनी गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

एका ३० वर्षीय महिलेने गावातील नीलेश तारिंगे (वय २७) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी गोरेगाव बुद्रुक येथील नीलेश तारिंगे या युवकाविरुद्ध २९ जानेवारी रोजी सायंकाळी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती युवकाला समजताच, तो व्यथित झाला. गावासह नातेवाइकांमध्ये बदनामी होईल. या भीतीने युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. प्रकरण चिघळण्याची भीती असल्याने, बाळापूर पोलिसांनी गावाकडे धाव घेतली आणि दोन्ही गटांतील लोकांची समजूत काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. गावातील तणावाची परिस्थिती पाहता, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. युवकाच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या