शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचा बस्ता घेण्यापूर्वीच सिरसो येथील युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 18:41 IST

मूर्तिजापूर/सिरसो : सिरसो येथील नवीन वस्तीत राहणाऱ्या २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देअतुल बाबूलाल चोटमल असे मृत युवकाचे नाव आहे.त्याचे नुकतेच लग्न ठरले होते आणि १२ मार्च रोजी त्याच्या लग्नाचे कपडे खरेदी करण्याचा बेत होता. १२ मार्च रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास राहत्या घरासमोरील जनावरांच्या गोठ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मूर्तिजापूर/सिरसो : सिरसो येथील नवीन वस्तीत राहणाऱ्या  २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. अतुल बाबूलाल चोटमल असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे नुकतेच लग्न ठरले होते आणि १२ मार्च रोजी त्याच्या लग्नाचे कपडे खरेदी करण्याचा बेत होता. कपडा घेण्यापूर्वीच युवकाने जगाचा निरोप घेतला. याप्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर शहरापासून जवळच येत असलेल्या सिरसो येथील नवीन वस्तीमध्ये राहत असलेला अतुल बाबूलाल चोटमल रा. गौतम नगर याने १२ मार्च रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास राहत्या घरासमोरील जनावरांच्या गोठ्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गौतम नगर नवीन वस्ती येथे एकच खळबळ उडाली आहे. अतुल चोटमल याचे लग्न जुळले होते आणि १२ मार्च रोजी लग्नाचे कपडे खरेदी करणार होते. त्यापूर्वीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह तपासणीकरिता स्थानिक श्रीमती लदेसा सामान्य उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास ग्रामीणचे पो.काँ. दिलीप खंडारे, सतीश बोधडे, संजय शिंगणे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर