शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

फुकट दारु दिली नाही म्हणून युवकाची भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:49 IST

अकोला : लहान उमरीतील सचिन पंत नामक इसमाच्या दारू दुकानावर कामावर असलेल्या एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.

अकोला : लहान उमरीतील सचिन पंत नामक इसमाच्या दारू दुकानावर कामावर असलेल्या एका युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर युवकाला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले.त्याच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळच्या सुमारास युवकाचा मृत्यू झाला.देशी दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी गेलेल्या गुंडाने फुकटात दारू मागितली; मात्र कामगाराने नकार दिल्यानंतर त्याला चाकूने भोसकले. त्यात कामगाराचा मृत्यू झाला. श्रीकांत कृष्णराव सोनुकुले (वय ३७, रा. लहान उमरी) असे मृतक मजुराचे नाव आहे. श्रीकांत सोनुकुले हे लहान उमरीतील सचिन पंत यांच्या देशी दारूच्या दुकानात काम करतात. सकाळी १० वाजताच्या सुमारास ते दुकानात कामाला आले. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या दुकानात रणजित वाघ हा गुंड प्रवृत्तीचा युवक नेहमीप्रमाणे दारू पिण्यासाठी आला. त्याने श्रीकांत सोनुकुले यांना फुकटात दारू मागितली. आधी पैसे दे म्हणताच आरोपी रणजित वाघने श्रीकांत सोनुकुले यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर आरोपी दुकानाच्या बाहेर गेला आणि काही वेळाने पुन्हा आल्यानंतर श्रीकांत यांच्या पोटात चाकूने सपासप वार केले. श्रीकांत त्याला प्रतिकार करण्यापूर्वीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास गंभीर जखमी असलेल्या श्रीकांत सोनुकुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झााला. या घटनेची माहिती सिव्हिल लाइन पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार वसंत मोरे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर आरोपी रणजित वाघ याची माहिती घेऊन त्याला तातडीने शोधून ताब्यात घेतले. रणजित वाघविरुद्ध सुरुवातीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला होता; मात्र सायंकाळी श्रीकांत यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.श्रीकांत सोनुकुले चालवायचे चहा टपरीश्रीकांत सोनुकुले यांची स्वत:ची सातव चौक परिसरात चहा टपरी होती. १० ते १५ दिवसांपूर्वीच सचिन पंत नामक दारू विक्रेत्याने श्रीकांत सोनुकुले हे निर्व्यसनी आणि प्रामाणिक असलेल्या श्रीकांत सोनुकुलेमुळे देशी दारूचे दुकान चांगले चालेल व लक्ष ठेवायचे काम नाही, या उद्देशाने पंत यांनी त्यांना कामाला ठेवले; मात्र याच दारू दुकानाने त्यांचा बळी घेतल्याची चर्चा होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी