शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसंत गाडगेबाबा चषक : वाशिमच्या पहिलवानाने जिंकली चांदीची गदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:57 IST

चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये खुल्या गटात वाशिमचा पहिलवान ज्ञानेश्वर गादेकर याने अकोल्याच्या नारायण नागे याच्यावर मात करीत चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. १५ हजार रु . रोख पारितोषिकासह श्रीसंत गाडगेबाबा चषकावर आपले नाव कोरले.

अकोला: श्री संत गाडगेबाबा व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळ अकोलाच्यावतीने ३० मे रोजी श्री संत गाडगेबाबा चषक विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये खुल्या गटात वाशिमचा पहिलवान ज्ञानेश्वर गादेकर याने अकोल्याच्या नारायण नागे याच्यावर मात करीत चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. १५ हजार रु . रोख पारितोषिकासह श्रीसंत गाडगेबाबा चषकावर आपले नाव कोरले.३५ किलो वजनगटात प्रेम श्रीनाथ, ४० किलो वृषभ गर्गे, ४५ किलो दिव सिरसाट, ५० किलो करण मलिये, ५५ किलो पंकज माकोडे, ६३ किलो गोविंद कपाडे, ७१ किलो वजनगटात अजय पकमोडे यांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धा समाप्तीनंतर लगेच बक्षीस वितरण कार्यक्रम झाला.बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा शहर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, नगरसेवक अनिल गरड, नगरसेवक सतीश ढगे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वर गादेकर याला चांदीची गदा, गाडगेबाबा चषक आणि रोख १५ हजार रु . पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. नारायण नागे यालादेखील सन्मानित करण्यात आले. सर्व गटातील विजेता व उपविजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला जुन्या पिढीतील मल्ल रमेश मोहकार, बंडू चांदुरकर, रू पलाल मलिये, बल्लू बुलबुले, अब्दुला पहिलवान, विदर्भ केसरी नजीर पहिलवान, राजू भिरड, अनिल बिडवे, ओंकार मुळे, विजय नागलकर, किशोर औतकर, रतन इचे व विजय उजवणे उपस्थित होते. यावेळी सर्व पहिलवानांचा संत गाडगेबाबा व्यायामशाळेचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांनी सत्कार केला. स्पर्धेत पंच म्हणून शिवा शिरसाट, महेंद्र मलिये, कुणाल माधवे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जयंत सरदेशपांडे, रवींद्र गोतमारे, राजेश नेरकर, गणेश माळी, किशोर अरू ळकर, गणेश श्रीनाथ, कैलास दामोदर, सतीश इंगळे, विष्णू अरू ळकर, दिगांबर दुतोंडे व आखाड्याचे मल्ल यांनी सहकार्य केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाWrestlingकुस्ती