शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

अनधिकृत फोर-जी केबलच्या माध्यमातून मनपाला ३० कोटींचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:26 IST

विविध भागात मुख्य रस्त्यांलगत खोदकाम करून फोर-जी केबलचे जाळे टाकण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे.

अकोला : महापालिकेतील भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विविध मोबाइल कंपन्यांनी अनधिकृत फोर-जी केबलच्या माध्यमातून प्रशासनाला आजवर तब्बल ३० कोटींचा चुना लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनपातील सत्ताधारी भाजपच्या कालावधीत गत अडीच वर्षांपासून शहराच्या विविध भागात फोर-जी केबलसाठी खोदकाम केले जात असल्याने प्रशासनासह सत्ताधारी भाजपने आजवर साधलेली चुप्पी वादाच्या भोवºयात सापडली आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने १६ डिसेंबर रोजी अंकात हा प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशानुसार अनेक मोबाइल कंपन्यांनी खोदकाम बंद केले आहे.शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी स्टरलाइट टेक कंपनीने शहरात २६ किलोमीटर अंतराचे सिंगल केबलचे जाळे टाकण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला होता. या प्रस्तावाला ९ डिसेंबर २०१९ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कंपनीला महापालिकेने सिंगल केबल टाकण्याची परवानगी दिली असली तरी संबंधित कंपनीकडून दोन पाइपद्वारे दोन वेगवेगळ्या केबल टाकल्या जात असल्याची तक्रार खुद्द सत्तापक्ष भाजपच्या नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली. मनपा प्रशासनाने स्टरलाइट टेक कंपनीला डिसेंबर महिन्यात खोदकामाची परवानगी दिल्याची माहिती असली तरी गत अडीच वर्षांपासून शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यांलगत खोदकाम करून फोर-जी केबलचे जाळे टाकण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संबंधित मोबाइल कंपन्यांना मनपा प्रशासनाने परवानगी दिली होती का, आणि दिली असल्यास मनपाला किती रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यावर प्रशासनासह पारदर्शी कारभाराचा दावा करणाºया सत्ताधारी भाजपने खुलासा करण्याची मागणी सुज्ञ अकोलेकरांमधून होऊ लागली आहे.‘एसआयटी’मार्फत व्हावी चौकशी!गत दोन वर्षांत महापालिकेचे विविध घोळ समोर आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भूमिगत गटार योजना, पाणी पुरवठा योजना, गुंठेवारी जमीन प्रकरण, सिमेंट रस्ते प्रकरण, शौचालयांचा घोळ, एलईडी पुरवठा आणि आता फोर-जी केबलचा घोळ समोर आला आहे. प्रकरणांची गुंतागुंत आणि व्याप्ती पाहता ‘एसआयटी’मार्फत चौकशीची मागणी होत आहे.

आयुक्तांनी नोटीस देताच कंपन्या गायबमनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केवळ स्टरलाइट टेक कंपनीला नोटीस जारी करताच त्याचा परिणाम इतर कंपन्यांवर झाल्याचे चित्र आहे. सदर प्रकरण प्रशासनापेक्षा सत्ताधारी भाजपला भोवण्याची चिन्हे दिसताच खोदकाम करणाºया कं पन्या साहित्यासह गायब झाल्याची माहिती आहे.रिलायन्सने १२ लाख जमा केलेच नाहीत!दीड वर्षांपूर्वी कौलखेड ते खडकी दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत रिलायन्स कंपनीच्या खोदकामात मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यावेळी लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला होता. याप्रकरणी भाजप नगरसेवक विजय इंगळे यांनी तक्रार दाखल करेपर्यंत झोपेचे सोंग घेणाºया जलप्रदाय विभागाने विजय इंगळे यांच्या तक्रारीनंतर कंपनीला १२ लाखांचा दंड बजावला होता. कंपनी दंडाची रक्कम जमा करीत नसल्याचे पाहून मनपाने खदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पुढे काहीही झाले नाही, हे विशेष.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका