शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

जागतिक परिचारिका दिवस : रुग्णसेवेतच जगण्याचा खरा आनंद - कांचन आठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 13:38 IST

११ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे कार्यरत अधिपरिचारिका कांचन मुकेश आठले (रेड्डी) यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.

अकोला : आम्हीही माणसेच... पण, घर संसार आणि विविध समस्यांना सामोरे जाऊन रुग्णसेवा करावी लागते. रोजची दगदग अन् कामाचा अतिभाग यातच रुग्णांच्या नातेवाइकांचा रोष नेहमीच परिचारिकांवर असतो; मात्र यापलीकडे स्वत:चे दु:ख विसरून रुग्णांवर मायेची फुंकर घालत त्यांची अहोरात्र सेवा करण्यातच जीवन जगण्याचा खरा आनंद आहे, असे अधिपरिचारिका कांचन मुकेश आठले (रेड्डी) यांनी म्हटले. १२ मे हा दिवस दरवर्षी जागतिक परिचारिका दिवस म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त शनिवार, ११ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे कार्यरत अधिपरिचारिका कांचन मुकेश आठले (रेड्डी) यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा परिचारिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे?डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केल्यानंतर परिचारिका रुग्णांजवळ जास्त काळ असते. त्यांच्या नातेवाइकांपेक्षा जास्त वेळ. त्यामुळे रुग्ण व परिचारिकांमध्ये एक भावनिक नाते निर्माण होते. त्यात रुग्ण बालक किंवा अनोळखी असल्यास त्यांची सेवा जास्त करावी लागत असल्याने ते कुटुंबातील एका सदस्यांप्रमाणेच असतात; पण कधीकधी नातेवाइकांचा धीर सुटतो अन् त्यांचा रोष परिचारिकांवरच ओढवतो; मात्र कुटुंबातील एक सदस्य म्हणून हा रोष पचवत परिचारिका रुग्णसेवेला प्राधान्य देतात.परिचारिकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे?वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत परिचारिकांची संख्या खूप कमी आहे. नियमानुसार चार ते पाच रुग्णांमागे एक परिचारिका असणे आवश्यक आहे; परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात केवळ २७५ परिचारिका कार्यरत आहेत. त्यामुळे एक परिचारीका ८० ते ९० रुग्णांचा सांभाळ करते. अशा परिस्थितीत रुग्णसेवा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कामाचा अतिभार झाल्याने स्वत:कडे तर दुर्लक्ष होतेच, शिवाय कुटुंबालाही वेळ देता येत नाही. संसार आणि रुग्णसेवेचा समतोल कसा साधता?रुग्णसेवा हे परिचारिकेसाठी व्रत आहे; पण त्याचसोबत परिचारिकांना त्यांचा संसारही आहे. गुण्यागोविंदाचा संसार करीत असताना रुग्णसेवेचे व्रत पूर्ण होऊ शकते, त्याला कारण म्हणजे परिचारिकेचे कुटुंब. कुटुंबातला प्रत्येक सदस्य आमच्या समस्या आणि वेदना समजून घेत असल्यानेच दोन्हीमधला समतोल साधणे सहज शक्य आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय