शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्जीकल कॉटन’ कारखान्यात मशिनचा पट्टा गळ्यात अडकल्याने कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 18:10 IST

अकोला - महाराष्ट्र राज्य औद्योगीक वसाहत महामंडळामधील वसाहत क्रमांक ४ मध्ये असलेल्या वैष्णवी सर्जीकल कॉटन कारखान्यात काम करीत असताना मशीनचा पट्टा तुटुन गळयात अडकल्याने तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

अकोला - महाराष्ट्र राज्य औद्योगीक वसाहत महामंडळामधील वसाहत क्रमांक ४ मध्ये असलेल्या वैष्णवी सर्जीकल कॉटन कारखान्यात काम करीत असताना मशीनचा पट्टा तुटुन गळयात अडकल्याने तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. एका मशीनचा पट्टा तुटल्यानंतर तो पट्टा या योगेश भालतीलक नामक आॅपरेटरच्या गळयात अडकल्याने त्याचा गळयाची नस चिरली आणि त्याचा मृत्यू झाला.मुळचे पैलपाडा येथील रहिवासी योगेश कैलासराव भालतीलक हे महाराष्ट्र औद्योगीक वसाहत महामंडळाच्या फेज क्रमांक ४ येथे असलेल्या तसेच शहरातील रहिवासी जगदीश गांधी यांच्या मालकीच्या वैष्णवी सर्जीकल कॉटन इंडस्ट्रीज येथे मशीन आॅपरेटर म्हणूण कामाला होते. सोमवारची सुटी झाल्यानंतर मंगळवारी ते एका मशीनवर काम करीत असतांना एका मशीनचा कटरचा पट्टा तुटला अन थेट योगेश भालतीलक या कामगाराच्या गळयाला अडकला. पट्टयाचा चिरेदार भाग गळयातील नसला लागताच योगेशच्या गळयाची नस चिरली. त्याने आरडा ओरड करताच वैष्णवी सर्जीकल कॉटन इंडस्ट्रीजमधील कामगारांनी त्यांना तातडीने एका वाहनात टाकून रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातच योगेश भालतीलक यांचा मृत्यू झाला. त्यांनी शहरातील एका मोठया रुग्णालयात योगेशला दाखविताच डॉक्टरला त्यांना मृत घोषीत केले. त्यानंतर योगेशचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. उत्तरिय तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यांचा मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच योगेशचे कुटुंबीय व मीत्र परिवारासह पैलपाडा येथील ग्रामस्थ अकोल्यात दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी एमआयडीसी पोलिसांकडे केली आहे. मात्र उत्तरीय तपासणीनंतरच या प्रकरणाची सत्यता समोर येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात