शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवादावरून शहरी डोकी भडकविण्याचे काम - अ‍ॅड. आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:25 IST

अकोला: सरकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वच पातळ्यांवर अपयश आल्याने नक्षलवादाचा मुद्दा पुढे करून शहरी नागरिकांची डोकी भडकविण्याचे काम मोदी, फडणवीस करीत आहेत.

अकोला: सरकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वच पातळ्यांवर अपयश आल्याने नक्षलवादाचा मुद्दा पुढे करून शहरी नागरिकांची डोकी भडकविण्याचे काम मोदी, फडणवीस करीत आहेत. हत्यारे सापडलेल्या सनातन्यांवर कारवाई करण्यातही कुचराई केली जात आहे, हा दुटप्पीपणा समजून आता नागरिकांनी देशाला वाचविण्यासाठी सरकारला धडा शिकवायला हवा, असे आवाहन भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. शासकीय विश्रामगृहात शनिवारी सायंकाळी त्यांनी विविध मुद्यांवर पत्रकारांना माहिती दिली.शहरी नक्षलवादी म्हणून मुंबई पोलिसांनी कारवाई केलेल्या लोकांकडे कोणतेच हत्यार सापडलेले नाही. त्याचवेळी सनातन्यांकडे बंदुका, बॉम्ब, हत्यारे सापडली. त्यांना पाठीशी घातले जात आहे. आतापर्यंत सापडलेले सर्व हत्यारधारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावाले आहेत. त्यांच्या हत्यारांचाही लोकांवर परिणाम होत नाही, असे दिसत असल्याने शहरी नक्षलवादाची संकल्पना मांडली जात आहे, तर हत्यार न सापडलेल्यांना शहरी नक्षलवादी म्हणून नागरिकांची डोकी भडकविली जात आहेत. शहरी नक्षलवादी कोण आहेत, हे न ठरविताच नक्षलवादाचा मुद्दा लोकांपुढे नेला जात आहे. हा प्रकार मोदी, फडणवीस यांना वेडाचे झटके आल्यासारखा आहे, असा घणाघातही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.देशात सर्वच स्तरावर ब्लॅकमेलिंगची राजनीती सुरू आहे. ५०० कोटींपर्यंत मालमत्ता असलेल्या ७५ हजार कुटुंबांनी देश सोडून इतर देशात स्थायिक होणे पसंत केले आहे. सरकारच्या जाचाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्या कुटुंबांना स्थानिक पोलीस, आयकर विभाग, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालयाकडून होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी देश सोडल्याचेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, सिद्धार्थ सिरसाट, पराग गवई, पुरुषोत्तम अहिर, महादेव सिरसाट व विलास जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 शहरातील भाजप फायनान्सवरही कारवाईभाजपला अर्थ पुरवठा करणाºया अकोल्यातील एकावर काही दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाकडून कारवाई करण्यात आली. त्यातून संबंधिताला दमबाजीही करण्यात आली. या दमबाजीच्या राजकारणाने देशाचे नुकसान होत आहे. जे ७५ हजार कुटुंबे देशाबाहेर गेले, त्यांनी देशातील संपत्ती विकली. त्याचे रूपांतर डॉलरमध्ये केले. त्यामुळे डॉलरचा तुटवडा निर्माण झाला.परिणामी, डॉलरची किंमत वाढली. त्यातूनही देशाचे नुकसान झाल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

१२ मतदारसंघांची मागणीकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षाशी युती व्हावी, ही आमची भूमिका आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसकडे ३७ जागांवर प्रभावी उमेदवार नाहीत. त्यापैकी केवळ १२ जागांची आमची मागणी आहे. आमचा कोणताही उमेदवार निवडणूक न लढताही आघाडीसाठी तयार आहे; मात्र अजेंड्यावर बोलणी करण्यासाठी कोणीही तयार नसल्याची वस्तुस्थिती आहे, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ