शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 12:52 IST

अकोला : जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी मंगळवारी दिली.

अकोला : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार असून, या योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी मंगळवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक प्रत्येक शेतकरी कुटुंबाला प्रती वर्ष सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून, त्यानुसार योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. योजनेसंदर्भात जिल्ह्यातील तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, महसूल व कृषी मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व संबंधित अधिकारी-कर्मचाºयांना ६ फेबु्रवारी रोजी संबंधित उपविभागीय अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाºयांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, ७ ते १० फेबु्रवारी दरम्यान गावनिहाय पात्र शेतकºयांच्या याद्या तयार करून तपासणी करण्यात येणार आहे. पात्र शेतकरी कुटुंबांच्या याद्यांची दोन टक्के तपासणी तहसील स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांकडून करण्यात येणार आहे., तसेच उपविभागीय अधिकाºयांकडून एक टक्का याद्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तहसील स्तरावर तालुकास्तरीय समित्यांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर पात्र शेतकºयांच्या याद्या २२ ते २६ फेबु्रवारी दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात येणार असल्याचेही निवासी उपजिल्हाधिकारी खंडागळे यांनी सांगितले.याद्या तयार करण्याचे तहसीलदारांना निर्देश!प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी खंडागळे यांनी दिली.पात्र शेतकºयांच्या याद्या ‘अपलोड’ करा: मुख्य सचिवांचे निर्देश!प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी मंगळवारी राज्यातील जिल्हाधिकाºयांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ घेतली. त्यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तातडीने तयार करून, पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश अकोला जिल्हाधिकाºयांसह राज्यातील जिल्हाधिकाºयांना मुख्य सचिवांनी दिले.योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरणाºया अशा आहेत व्यक्ती!प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमधील निकषानुसार या योजनेच्या लाभासाठी संवैधानिक पद धारण केलेले व करणारे आजी-माजी व्यक्ती, आजी-माजी राज्यसभा सदस्य, माजी खासदार, आजी राज्यमंत्री, माजी मंत्री, माजी महापौर, आजी विधान परिषद सदस्य, आजी-माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांचे कर्मचारी, स्थानिक अख्त्यातरीत कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून स्वराज संस्थांमधील नियमित अधिकारी, मागील वर्षी आयकर भरलेल्या व्यक्ती, दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निवृत्तीवेतन असलेल्या निवृत्ती वेतनधारक व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, अभियंता, वकील, सनदी लेखापाल व वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी अपात्र आहेत.जिल्ह्यात असे आहेत अल्पभूधारक शेतकरी!तालुका                                                     शेतकरीअकोला                                                     ५६,९४०बाळापूर                                                    २९,३७१पातूर                                                        २५,९५९मूर्तिजापूर                                                ३४,०१३बार्शीटाकळी                                              २८,८३३अकोट                                                      ३९,३४०तेल्हारा                                                     २९,४९४....................................................................................एकूण                                                      २,४३,९५०

 

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभागFarmerशेतकरी