शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

अधिवेशनाचा धसका, आरोग्य विभागात सुटीच्या दिवशीही काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 3:17 PM

सुटीच्या दिवशी आरोग्य विभागाच्या सर्वच कार्यालयातील कामकाज सुरूच ठेवले जाणार आहे.

अकोला : महाराष्ट्र विधान मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याने या दरम्यानच्या काळातील सुटीच्या दिवशी आरोग्य विभागाच्या सर्वच कार्यालयातील कामकाज सुरूच ठेवले जाणार आहे. त्याबाबतचा आदेश आरोग्य सेवा आयुक्तांनी १७ फेब्रुवारी रोजी दिला आहे.विधान मंडळाचे अधिवेशन मुंबई येथे सुरू होत आहे. त्यामध्ये सर्वच विभागाचे प्रश्न उपस्थित होणार आहेत. ते प्रश्न प्राप्त करून घेणे, त्याची उत्तरे तयार करणे, ही जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची आहे. त्यामुळे ऐनवेळेपर्यंत प्राप्त प्रश्नांची उत्तरे देता यावी, यासाठी अधिवेशनापूर्वीच्या सुटीच्या दिवशी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय आरोग्य सेवा आयुक्तांनी १७ फेब्रुवारी रोजी घेतला. त्या निर्णयानुसारचा आदेश सर्वच स्तरावरील आरोग्य विभागाच्या कार्यालयांना सोमवारीच देण्यात आला. त्यामध्ये १९ व २२ फेब्रुवारी रोजी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्याचे म्हटले आहे. त्या दिवशी अधिवेशनातील प्रश्नोत्तरांसह इतर अती महत्त्वाची कामे केली जातील. या सुटीच्या दिवशी आरोग्य सेवा संचालक मुंबई, पुणे, सर्व कार्यक्रम प्रमुख, सर्व परिमंडळ आरोग्य उपसंचालक कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व जिल्हा परिषदांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय या कार्यालयातील कामकाज सुरू ठेवले जाईल. सोबतच इतरही विभागांच्या कार्यालयातील कामकाजही सुरू राहणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला