शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सखी मतदान केंद्र म्हणजे कौटुंबिक सोहळ्यात आल्यासारखं वाटतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 15:21 IST

अकोला पश्चिम विभागाकरिता मुंगीलाल बाजोरिया विद्यालय आणि अकोला पूर्व विभागाकरिता सीताबाई कला महाविद्यालय येथे सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते.

- नीलिमा शिंगणे -जगडअकोला: लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये पहिल्यांदाच महिला मतदारांमध्ये जागरू कता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने आणि जिल्हा प्रशासनाने नवीन पाऊल उचलले. विधानसभा क्षेत्रनिहाय सखी मतदान केंद्र (आॅल वुमेन पोलिंग बुथ) तयार करण्यात आले होते. अकोला शहरात दोन केंद्र होते. यामध्ये अकोला पश्चिम विभागाकरिता मुंगीलाल बाजोरिया विद्यालय आणि अकोला पूर्व विभागाकरिता सीताबाई कला महाविद्यालय येथे सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी मतदानाला आलेल्या महिलांशी लोकमतने संवाद साधला असता, येथे येऊन अगदी कौटुंबिक सोहळ्यात आल्यासारखं वाटत आहे, असे म्हणाल्या.

या केंद्रामध्ये मतदानासंबंधी सर्व प्रक्रियेचे संचालन महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने केले. केंद्राच्या सुरक्षिततेची जबाबदारीदेखील महिला पोलिसांनीच केली. महिलांनी निर्भिडपणे मतदान केंद्रावर पोहचून मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपला मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावावा, हा यामागील उद्देश होता.गुलाबी रंगाने सजले मतदान केंद्रसखी मतदान केंद्र संपूर्ण गुलाबी आणि पांढऱ्या रंगाने सजविण्यात आले होते. गुलाबी आणि पांढºया रंगाच्या फुग्यांनी संपूर्ण परिसर फुलून गेला होता. केंद्रातील महिला अधिकारी आणि त्यांना सहकार्य करणाºया सर्व महिलांनी गुलाबी साड्या परिधान केल्या होत्या. सीताबाई कला महाविद्यालय केंद्राने यामध्ये बाजी मारली होती. अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती. पाहता क्षणीच कुठल्या लग्नसमारंभात आल्यासारखे भासत होते.

सेल्फी पॉइंटमहिलांचा व तरुणाईचा मतदानाबाबत उत्साह वाढविण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते. सीताबाई महाविद्यालयात महाराष्ट्रीय वेशभूषेतील स्त्री व पुरुषांचे कटवर्क ठेवण्यात आले होते. महिलांनी, युवतींनी तसेच पुरुषांनादेखील येथे सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

हिरकणी कक्षस्तनदा मातांकरिता हिरकणी कक्षाची सखी मतदान केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. महिलांना बसण्याकरिता येथे सोफा आणि खुर्चा ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय खेळणी, पिण्याचे पाणी, प्रसाधन गृहाचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती.बालसंगोपनचा फक्त फलकमनपा शाळा क्रमांक एक येथे केवळ विश्रांती व बालसंगोपनचा फलक लावण्यात आला होता; मात्र या ठिकाणी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. खरे तर या भागातील महिलांना सखी केंद्राची प्रकर्षाने आवश्यकता होती. हिरकणी कक्ष फक्त नावालाच होता. 

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोला