मोताळा (बुलडाणर): धामणगावबढे येथील वाहने जाळपोळ व गावठी बॉम्ब प्रकरणात अटकेत असलेली मुख्य सूत्रधार संगीता पाटील या महिलेच्या पोलीस कोठडीत १६ फेब्रुवारीपर्यंत वाढ झाली आहे. धामणगाव बढे येथील परवेज अबू बकर पटेल यांच्या घरासमोर पार्किग केलेली एक दुचाकी व स्कॉर्पिओ वाहनाला आग लावून ही वाहने अज्ञात व्यक्तीने २ जानेवारीच्या रात्री जाळली होती, तर त्याच रात्री पटेल यांच्या इमारतीमध्ये गावठी बॉम्ब लावून नुकसान करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील सिनेजगताशी संबंधित संगीता पाटील हिला धा. बढे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. तिला १0 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी पोलिसांनी संगीता पाटील हिला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता, तिच्या पोलीस कोठडीत १६ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. धामणगाव बढे पोलिसांनी अटक केलेल्या या महिलेकडून नेमकी कोणती माहिती कोठडीदरम्यान मिळते, यावरच पोलिसांचा पुढील तपास अवलंबून राहणार आहे. त्यामुळे प्रकरणात चौकशीदरम्यान काय बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
‘त्या’ महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ
By admin | Updated: February 11, 2015 00:59 IST