लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :कौलखेड रोडवर असलेल्या दुर्गा लॉन्सच्या बाजूच्या श्यामसुंदर लहरिया संकुल २ मध्ये गुरुवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालीत तब्बल तीन फ्लॅट फोडून दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.लहरिया संकुलमधील रहिवासी मोहिनी दरेकर, नरेंद्र काकड व प्रतिभा परनाटे यांचे तीन फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी प्रतिभा परनाटे यांच्या घरातील ७0 ग्रॅमचे दागिने पळविले असून, हे दागिने दोन लाख रुपये किमतीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परनाटे या घरात कापड शिवण काम करतात. शेजारीच मैत्रिणीकडे कापड देण्यासाठी गेल्या असता, दीड तासातच चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून चोरी केली व पळून गेले. दरेकर व काकड यांच्या घरात चोरट्यांना काहीही मिळाले नाही. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून, चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
लहरिया संकुलातील तीन फ्लॅटमध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:45 IST
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :कौलखेड रोडवर असलेल्या दुर्गा लॉन्सच्या बाजूच्या श्यामसुंदर लहरिया संकुल २ मध्ये गुरुवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालीत तब्बल तीन फ्लॅट फोडून दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.लहरिया संकुलमधील रहिवासी मोहिनी दरेकर, नरेंद्र ...
लहरिया संकुलातील तीन फ्लॅटमध्ये चोरी
ठळक मुद्देदोन लाखांचा मुद्देमाल लंपासगुरुवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालीत