बोरगाव मंजू : मद्य प्राशन केल्यामुळे इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बोरगाव मंजू येथे बुधवार, ४ जून रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडली. गुलाबराव अजाबराव वाघमारे, असे मृतकाचे नाव आहे. बोरगाव मंजू येथील रामजीनगरातील रहिवासी गुलाबराव अजाबराव वाघमारे यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास मद्य प्राशन केले. ते मद्यधुंद अवस्थेत रविदास चौकातील गणेश टाले यांच्या वाळूच्या ढिगावर पडले. रखरखत्या उन्हात बराच वेळ तेथे पडून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. टाले यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
मद्य प्राशनामुळे इसमाचा मृत्यू
By admin | Updated: June 4, 2014 22:03 IST