शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

हेतुपुरस्सर दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:14 IST

डॉक्टरांनी तातडीने सेवा सुरू करण्याच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात येत असल्याचेही पापळकर यांनी स्पष्ट केले आहे.

- सचिन राऊत

अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतानाच खासगी डॉक्टरांनी त्यांचे हॉस्पिटल बंद केल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आणल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अशा डॉक्टरांनी हेतुपुरस्सर दवाखाने बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या डॉक्टरांनी तातडीने सेवा सुरू करण्याच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात येत असल्याचेही पापळकर यांनी स्पष्ट केले आहे.राज्यातील डॉक्टरांसाठी महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम २०२० साथरोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी तसेच शासकीय सेवेत असलेल्या डॉक्टरांनी त्यांची सेवा देणे बंधनकारक आहे; मात्र असे असतानाही कायद्याला न जुमानता शहरातील बहुतांश हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे. कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या भीतीने डॉक्टरांनीच मैदान सोडल्याचे वास्तव लोकमतने सोमवारी केलेल्या पाहणीत उघड केले होते. अशा गंभीर प्रकारच्या संकटात रुग्णांना व प्रत्येकाला आधार देण्याची जबाबदारी ज्या डॉक्टरांवर आहे, त्यांनीच अशा प्रकारची भूमिका घेतल्याने विभागीय आयुक्त यांनी आदेश देऊन रुग्णालय तातडीने उघडण्याचे निर्देश दिले; मात्र त्यांचे निर्देश डॉक्टरांकडून पाळण्यात येतात का, याची तपासणी लोकमतच्या चमूने केली असता कोणतेही कारण नसताना डॉक्टरांनी रुग्णालय बंद केल्याचे दिसून आले. या प्रकाराला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गंभीरतेने घेत रुग्णालय विनाकारण बंद ठेवणाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला असून, खरे आणि तेवढेच गंभीर कारण असेल तर रुग्णालय बंद ठेवले तर हरकत नाही; मात्र किरकोळ कारणे समोर करून रुग्णालय बंद ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई निश्चित होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. या कायद्यानुसार होणार कारवाईप्रत्येक डॉक्टरने त्यांची ओपीडी तसेच इतर विभाग सुरू ठेवण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला आहे; तसेच या आदेशाप्रमाणे कामकाज होते की नाही, याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर देण्यात आली आहे; मात्र या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम २०२०, साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल