शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्याकडून पैशासाठी पत्नीचा छळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:55 IST

रविवारी त्यांच्याविरुद्ध जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : चांगल्या पोलीस ठाण्यात, चांगल्या पदावर बदली व्हावी, यासाठी लागणारे १५ लाख रुपये माहेरहून आणावे म्हणून एका पोलीस अधिकाºयानेच पत्नीचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किशोर वानखेडे असे या पोलीस अधिकाºयाचे नाव असून, ते डाबकी रोड पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. रविवारी त्यांच्याविरुद्ध जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.योगिता यांच्या तक्रारीनुसार, त्या मूळ नाशिक येथील सिडको चाणक्य नगर येथील रहिवासी असून, २०११ मध्ये त्यांचा विवाह अमळनेर येथील किशोर यांच्यासोबत झाला. लग्नाच्या वेळी योगिता यांच्या कुटुंबीयांनी ८ लाख २५ हजार रुपये हुंडा व लग्न असा एकूण १५ लाख रुपयांचा खर्च केला. लग्नानंतर पतीची पहिली नेमणूक पुणे येथे झाली. त्यानंतर नाशिक, बुलडाणा जिल्ह्यात त्यांची बदली झाली. दरम्यानच्या काळात योगिता यांना एक मुलगी व मुलगा झाला. अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्यात त्यांची बदली झाल्यानंतर कार्यालयीन त्रास होऊ लागला. पोलीस ठाण्यात त्रास होत असल्याने पती किशोर हे योगिता यांना त्रास देऊ लागले. बदलीसाठी माहेरहून १५ लाख रुपये घेऊन ये, यासाठी मारहाण व शिवीगाळ करायचे. या त्रासाला कंटाळून योगिता या आजी व दोन्ही मुलांसह जळगावात विभक्त राहत आहेत. वेगळे निघाल्यावर पतीने योगिताचे २२ तोळे सोन्याचे दागिनेही काढून घेतले. तुला सोने देणार नाही, तुला जे करायचे ते कर, अशी धमकी दिली होती. या मानसिक तसेच शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने रविवारी जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून किशोर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी