अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातील दोनद बु. या नदीकाठावरील अख्ख गाव तापाच्या साथीने फणफणत आहेत. गत तीन आठवड्यापासून गावात तापाच्या साथीने थैमान घातले असून, जलजन्य व कीटकजन्य आजारांनी ग्रामस्थ हैरान झाले आहेत. तापाच्या साथीने गावातील एका चिमुकल्याचा बळी गेल्यानंतरही जीवघेण्या समस्येकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.बाश्रीटाकळी तालुक्यातील दोनद बु. हे एक हजार १५0 लोकसंख्या असलेले गाव. काटेपूर्णा नदीच्या तिरावर २५0 कुटुंब असून, त्यांना कुठल्याही मूलभूत सुविधा प्रशासनाकडून पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असून, हातपंपानजीक असलेल्या खतामधील घाणीमुळेही साथीचे आजार वाढले आहेत. गावात टायफाईड व व्हायरल तापाची प्रचंड साथ आली असून ,२५0 घरांमध्येही तापाचे रुग्ण आहेत. यामधील एका ८ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू या तापाने झाला असून, ग्रामपंचायत प्रशासन मात्र साफसफाईकडे अद्यापही दुर्लक्ष करीत आहे. या गावातील नागरिक गत तीन आठवड्यापासून टायफाईड व व्हायरल तापाचा सामना करीत आहेत. सवरेपचार रुग्णालयामध्ये २0 रुग्णांवर ८ सप्टेंबरपासून उपचार सुरू असून व बाश्रीटाकळी येथील शासकीय रुग्णालयांमध्येही काही रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यासोबतच खासगी रुग्णालयांमध्येही या गावातील रुग्ण दाखल आहेत. अख्खे गाव टायफाईड व व्हायरल तापाने हैरान झाले असून, या ठिकाणी तातडीने आरोग्य सुविधा पुरविण्याची गरज आहे. ** अज्ञात आजाराने दगावला मुलगा दोनद बु. : बाश्रीटाकळी तालुक्यातील दोनद बु. गावात गत आठ ते दहा दिवसांपासून अज्ञात आजाराची साथ सुरू असून, गावातील अनेक लोक तापाने फणफणले आहेत. मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी मलेरियासदृश तापाने गावातील ९ वर्षी मुलगा दगावल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
अख्खे गाव तापाने फणफणतेय!
By admin | Updated: September 18, 2014 02:15 IST