शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे मनोरुग्णच- राजन खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 18:53 IST

अकोला: जगामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी मानणारे लोक आहेत. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत, असे टीकास्र कथालेखक आणि कादंबरीकार राजन खान यांनी सोडले.

अकोला: जगामध्ये अनेक काल्पनिक गोष्टी मानणारे लोक आहेत. ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव-धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत, असे टीकास्र कथालेखक आणि कादंबरीकार राजन खान यांनी सोडले.बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने प्रमिलाताई ओक सभागृह येथे आयोजित नवरात्र व्याख्यानमालेतील आठवे पुष्प गुंफ ताना शनिवारी वक्ता म्हणून राजन खान ‘माणूस म्हणून जगणं’ या विषयावर बोलत होते. राजन खान पुढे म्हणाले की, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जीवन जगताना पाच रू पडी आपल्यासमोर सातत्याने येत असतात. हे रू पडी म्हणजे जात, धर्म, देव (परमेश्वर), लिंगभेद आणि सर्व प्रकारचा भ्रष्टाचार. यापुढील पारदर्शी, प्रामाणिक असा नवा समाज उदयाला आला पाहिजे, असे वाटत असेल तर पाच रू पडे सोडले पाहिजे.आपल्याकडील साहित्यदेखील जाती-धर्माने ओळखले जाते. साहित्य लेखकाच्या नावा-आडनावावरू न तो लेखक कोणत्या प्रकारचा साहित्यिक आहे, हे ओळखल्या जाते, ही दुर्दैवाची बाब आहे. साहित्य हे साहित्य असते, त्याला कोणतीही जात नसते. त्याचा कोणताही धर्म नसतो, असेही खान म्हणाले. समाजासाठी झटणाऱ्या लोकांना आपल्याच समाजतील लोक जगू देत नाहीत. समाजासाठी लढणाºया ध्येयवेड्या लोकांना जगू दिले पाहिजे. समाजाच्या शांतीसाठी झटणारी ही माणसे आहेत. जाती-धर्माच्या संघर्षातून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे, आज आपण माणूस म्हणून जगण्याची गरज आहे. पोलीस घेऊन फिरण्याची वेळ येऊ नये, असा समाज आज अपेक्षित आहे, असे विचार खान यांनी व्यक्त केले.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात घरातील संवाद हरविले आहेत. घरात गप्पा करणे हा प्रकार कोठेच दिसत नाही. स्पर्शाची भाषा संपली आहे. दोन माणसांमधील नाती नष्ट झाली आहेत. मुखवटे घेऊन समाजात व्यक्ती वावरताना दिसतात. कौटूंबिक आणि समाजिक पातळीवर जेव्हा दोन व्यक्ती भेटतात, तेव्हा आपण आपली प्रतिमा समोर पाठवित असतो. संवाद प्रतिमांशी होतो, माणसांशी होत नाही. हे खोटे जगण्याचे मुखवटे जेव्हा काढल्या जातील, तेव्हाच माणूस शांतीने आणि सुखा- समाधानाने जगू शकेल, असे खान यांनी सांगितले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक