शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुध्दिबळ स्पर्धा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 21:59 IST

अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुध्दिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे संघाने पटकाविले. पुरू ष व महिला दोन्ही गटामध्ये पुणे विद्यापीठाने विजेतेपद पटकावित स्पर्धेत आघाडी कायम राखली.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला - अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुध्दिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे संघाने पटकाविले. पुरू ष व महिला दोन्ही गटामध्ये पुणे विद्यापीठाने विजेतेपद पटकावित स्पर्धेत आघाडी कायम राखली. पहिल्या दिवसापासूनच पुणे विद्यापीठाने दोन्ही गटात आपले वर्चस्व सिध्द केले होते. पुरू षांच्या गटात साडे सत्तावीस गुण तर महिला गटात वीस गुण मिळवून पुणे विद्यापीठाने प्रथम स्थान मिळविले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे सोमवारी स्पर्धेचा समारोप झाला.या स्पर्धेत पुरू षगटामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने साडेसत्तावीस गुणांसह प्रथम, मुंबई विद्यापीठाने पंचवीस गुणांसह द्वितीय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ बावीस गुणांसह तृतीय आणि एमआयटी वर्ल्डपीस विद्यापीठ पुणे संघाने चतुर्थस्थान मिळविले. महिलांच्या गटामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाने प्रथम, शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर द्वितीय, मुंबई विद्यापीठ तृतीय आणि डॉ.हरिसिंग गौर विद्यापीठ सागर संघाने चतुर्थस्थान मिळविले.पुरू षांच्या गटात सर्वाधिक ८ गुण एमआयटी वर्ल्डपीस विद्यापीठ पुणे संघाचा देवांशू मिस्त्री, मुंबई विद्यापीठाचा  चिराग सत्कार व सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचा निखिल दिक्षित यांनी मिळविले. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचाच रणवीर मोहिते, अखिलेश नागरे यांनी ६ गुण मिळवून सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. महिला गटात संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची नागलक्ष्मी आर. हिने सर्वाधिक ८ गुण मिळविले. तर बडोदा विद्यापीठाची लासनी कोठारी, मुंबई विद्यापीठाची गिरीश्मा अस्सार या दोघींनी साडे सात गुण मिळविले. हरिसिंग विद्यापीठ सागरची प्रतिक्षा पटेल, नांदेड विद्यापीठाची प्रसन्ना तुनगर आणि उदयपुरच्या  दिपिका साहु यांनी ५ गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली.पाच दिवसीय या स्पर्धेचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि महाविद्यालयाने केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या पाच राज्यातील सुमारे सहाशेच्या वर बुध्दिबळपटू सहभागी झाले होते. पुरू षांच्या गटात ४८ आणि महिला संघात ४१ विद्यापीठ संघाने सहभाग नोंदविला होता.स्पर्धेचा समारोपस्पर्धा समाप्तीनंतर लगेच बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी कल्याण संचालक आर.जी.देशमुख, एसबीआयचे कृष्णकुमार टेकाटे, डॉ. एस.आर दलाल, डॉ. प्रकाश नागरे, डॉ. उमेश राठी, डॉ. खर्चे विराजमान होते.  मान्यवरांचे स्वागत डॉ. आर.जी.देशमुख यांनी केले.यावेळी संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक योगेन्द्र पाटिल पुणे, डॉ. विशाल तिवारी अजमेर, राहुल लहाने कोल्हापुर, हितेश चौधरी गुजरात आणि खेळाडू वैष्णवी आखडे यांनी आपल्या मनोगतामध्ये स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याचे सांगितले. डॉ. भाले यांनी आपल्या भाषणात, पुढील वर्षी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. आभार डॉ. मोहन कोटावार यांनी मानले.

टॅग्स :Chessबुद्धीबळAkolaअकोला