अकोला - विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पश्चिम वर्हाडातील दिग्गज नेत्यांनी संधी मिळेल त्या पक्षात घरठाव केल्याचे चित्र दिसत आहे.अकोला जिल्ह्यात पक्षांतराच्या वार्याचा जोर तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. नारायण राणे सर्मथक म्हणून ओळखले जाणारे येथील काँग्रेस नेते विजय देशमुख यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस नेते योगेंद्र गोडे यांना भाजपने बुलडाणा मतदारसंघाची उमेदवारी दिली असून, चिखली मतदारसंघात काँग्रेसचे धृपदराव सावळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.वाशिम जिल्ह्यात भाजपचे सरचिटणीस डॉ. दीपक ढोके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर वाशिम मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला असून, पुर्वाश्रमीचे शिवसेना नेते राजेंद्र पाटणी यावेळी भाजपच्या तिकीटावर कारंजा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. शिवसेनेचे हेमेंद्र ठाकरे यांनी याच मतदारसंघातून स्वाभीमानी शेतकरी पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केली असून, मनसेचे विश्वनाथ सानप यांनी रिसोड मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पश्चिम व-हाडात पक्षांतराचे वारे
By admin | Updated: September 28, 2014 00:58 IST