शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाच-सहा दिवसात मान्सून पोहोचणार पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 14:37 IST

आता सार्वत्रिक पावसासाठीचे वातावरण अनुकूल होत असून, २२ व २३ रोजी नैर्ऋत्य तर २५ ते २८ पर्यंत पूर्व किनारपट्टीकडून पावसाचे आगमन होणार आहे.

ठळक मुद्देसध्या वातावरणात बदल होत असून, महाराष्ट्रातील हवेचा दाब कमी होत आहे. विदर्भातही असेच अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आता पश्चिम विदर्भातही मान्सूनच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे २५ ते २८ जूनपर्यंत पूर्व व मध्य विदर्भात पूर्वेकडून पाऊस येण्याची शक्यता आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: यावर्षी हवामान शास्त्र विभागाच्या सर्वच अंदाजाला हुलकावणी देत राज्यात सार्वत्रिक पावसाचे आगमन लांबले असून, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे; पण आता सार्वत्रिक पावसासाठीचे वातावरण अनुकूल होत असून, २२ व २३ रोजी नैर्ऋत्य तर २५ ते २८ पर्यंत पूर्व किनारपट्टीकडून पावसाचे आगमन होणार आहे. त्यानंतर सार्वत्रिक पाऊस सुरू च राहणार असल्याचे भाकीत कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविले आहे.राज्यात यावर्षी सुरुवातीला वेळेवर व भरपूर सरासरी १०२ टक्के तर त्यानंतरच्या सुधारित अंदाजानुसार ८८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली होती. काही भागात मान्सूनने प्रवेश केला असला तरी राज्यात बहुतांश भाग मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये प्रामुख्याने पश्चिम विदर्भ व उत्तर महाराष्टÑाचा समावेश आहे. मान्सून आता आला तरी शेतकºयांना मात्र पिकात फेरबदल करावे लागणार असल्याचे शेतकºयांची चिंता वाढली आहे.दरम्यान, सध्या वातावरणात बदल होत असून, महाराष्ट्रातील हवेचा दाब कमी होत आहे. विदर्भातही असेच अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात पाण्याचे तापमान ३१ डिग्री सें. पर्यंत वाढले असून, ही सर्व पोषक स्थिती बघता, पूर्व किनारपट्टीकडून हवेचा दाब कमी झाला आहे. त्यामुळे २५ ते २८ जूनपर्यंत पूर्व व मध्य विदर्भात पूर्वेकडून पाऊस येण्याची शक्यता आहे. तर २२ व २३ जून रोजी नैर्ऋत्येकडून पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात मान्सून या अगोदरच पोहोचला आहे. आता पश्चिम विदर्भातही मान्सूनच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.- महाराष्टÑातील व विदर्भातील हवेच दाब कमी होत असून, बंगालच्या उपसागरात तापमान वाढले तर पूर्व किनारपट्टीकडून हवेचा दाब कमी झाल्याने सार्वत्रिक पावसासाठी स्थिती सध्या अनुकूल आहे. त्यामुळे २२, २३ ला पश्चिम विदर्भात, २५ ते २८ जूनपर्यंत पूर्व विदर्भात पाऊस होण्याची शक्याता आहे. त्यानंतर पाऊस सुरू राहील.डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ,कृषी सल्लागार,पुणे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018AkolaअकोलाAkolaअकोलाVidarbhaविदर्भ