आकोट : नगरपरिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आठवडी बाजारातील न. प. शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील फायबरचे मूत्रीघर शुक्रवारी दुपारी जळून खाक झाले. अशातच नागरिक व व्यापार्यांसाठी असलेले तथा स्वच्छतेअभावी अडगळीत पडलेले मूत्रीघर जळाले आहे.आठवडी बाजारातील या मूत्रीघरालगतच लोखंडी कचरापेटीसुद्धा ठेवण्यात आली आहे; परंतु स्वच्छतेअभावी सदर मूत्रीघराचा परिसरातील व्यापारी उपयोग करीत नव्हते. अशातच २ मे रोजीच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक फायबरच्या मूत्रीघराला आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी येथील व्यापार्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याने वापर केला. आगीची माहिती नगरपरिषदेच्या संबंधितांना देण्यात आली होती; परंतु फायबरचे मूत्रीघर जळून खाक होईपर्यंत ५० मीटरच्या अंतरावर असलेले न. प. चे अग्निशमन दल पोहचले नव्हते. त्यामुळे व्यापार्यांनी रोष व्यक्त केला. सुदैवाने आगीने आजूबाजूच्या परिसरातील दुकानांचे नुकसान झाले नाही. आगीचे कारण कळू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)फोटो : ०६एकेटीपी०२.जेपीजीकॅप्शन : आगीत जळालेले फायबरचे मूत्रीघर.
आठवडी बाजारातील मूत्रीघर जळून खाक
By admin | Updated: May 7, 2014 04:13 IST