शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांचा आठवडा : पहिला दिवस लेट लतिफ कर्मचाऱ्यांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 11:28 IST

जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींमध्ये वेळेवर उपस्थित राहण्याला पहिल्याच दिवशी खो दिल्याचे चित्र दिसून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य शासनाने शासकीय कार्यालयातील कामकाजाचा साप्ताहिक कालावधी पाच दिवसांचा करतानाच दैनंदिन कामाच्या वेळेत ४५ मिनिटांची वाढ केली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे; मात्र जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींमध्ये वेळेवर उपस्थित राहण्याला पहिल्याच दिवशी खो दिल्याचे चित्र दिसून आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे अधिकारी-कर्मचारी वठणीवर येतात की नाही, ही भीती या निमित्ताने निर्माण होत आहे.आरोग्य, सार्वजनिक परिवहनसह अत्यावश्यक सेवा वगळून पाच दिवसांचा आठवडा राज्यात २ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात लागू झाला आहे. सुटीच्या दोन दिवसांची सवलत देतानाच दैनंदिन कामकाजाचे तास वाढवण्याचा पर्याय वापरण्यात आला. त्यामध्ये कर्मचाºयांनी सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तर सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित राहावे, अशी वेळ ठरली आहे. ग्रामीण भागातील विकास कामांची धुरा वाहणाºया जिल्हा परिषदेत २५ पेक्षाही अधिक अधिकारी-कर्मचारी वेळेवर पोहचले नाहीत. तर अकोला शहराचे प्रशासन चालणाºया महापालिकेत एकही कर्मचारी वेळेत पोहचला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. हीच परिस्थित कमी-अधिक प्रमाणात सर्वच नगर परिषद, पंचायत समित्यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचारी वेळेवर उपस्थित राहणार की नाही, हा मुद्दा पहिल्याच दिवशी निराशाजनक ठरला आहे. त्यामध्ये बदल न झाल्यास पाच दिवसांच्या आठवड्याचा प्रत्यक्ष सेवेवर कोणताच फरक पडणार नसल्याचेही चिन्हे आहेत.जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगर परिषद, नगर पंचायतींमध्ये या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांनीही अधिकारी-कर्मचाºयांची बाजू न घेता त्यांच्याकडून कामाच्या वेळा पाळण्यासाठी वॉच ठेवण्याची गरज आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद