लग्न साेहळे धूमधडाक्यात; अकाेलेकर गाफील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:14 AM2021-06-18T04:14:32+5:302021-06-18T04:14:32+5:30

काेराेना विषाणूच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत वयाेवृद्धांसह तरुणांच्या मृत्यूची संख्या जास्त हाेती. या लाटेत अनेकांच्या संसाराची घडी काेलमडली. काेराेनाबाधितांच्या ...

Wedding parties in full swing; Akalekar Ghafil | लग्न साेहळे धूमधडाक्यात; अकाेलेकर गाफील

लग्न साेहळे धूमधडाक्यात; अकाेलेकर गाफील

Next

काेराेना विषाणूच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत वयाेवृद्धांसह तरुणांच्या मृत्यूची संख्या जास्त हाेती. या लाटेत अनेकांच्या संसाराची घडी काेलमडली. काेराेनाबाधितांच्या संख्येचा आलेख वाढता असल्यामुळे फेब्रुवारी ते मे महिन्याच्या कालावधीत शहरातील रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली हाेती. रेमडेसिविरसह ब्लॅक फंगसच्या औषधींसाठी रुग्णांच्या नातेवाइकांवर अक्षरश: पायपीट करण्याची पाळी ओढवली हाेती. मे महिन्याच्या अखेरपासून ही लाट ओसरली. मागील काही दिवसांपासून बाेटांवर माेजण्याइतपत रुग्णसंख्या आढळून येत असल्याचे पाहून अकाेलेकर धूमधडाक्यात लग्न साेहळ्यांचे आयाेजन करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यादरम्यान, कार्यक्रमांमध्ये साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांना केराची टाेपली दाखवली जात असल्यामुळे काेराेनाच्या प्रसाराची व प्रादुर्भावाची शक्यता बळावली आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांवर ‘वाॅच’ नाहीच !

काेराेना विषाणूच्या अनुषंगाने लग्न साेहळ्यांसह इतर कार्यक्रमांना मर्यादित उपस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन हाेत असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मनपाचाही ‘वाॅच’ नसल्यामुळे अकाेलेकर बेफिकीर झाले आहेत.

अकाेलेकरांनाे काळजी घ्या!

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही संपला नाही, याचे सुज्ञ अकाेलेकरांनी भान ठेवण्याची गरज आहे. लग्न साेहळ्यांत तसेच इतर कार्यक्रमांत लहान मुलांच्या आराेग्याला जपण्याची नितांत आवश्यकता असताना तसे हाेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कार्यक्रमांचे आयाेजन करताना नियमांचे पालन करून कुटुंबीयांची काळजी घेण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

Web Title: Wedding parties in full swing; Akalekar Ghafil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.