शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

करडी तेलबिया पीक नामशेष होण्याच्या मार्गावर, यंदा बियाणांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 13:52 IST

सन 1999-2000 पर्यंत राज्यात करडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. परंतु, या पिकाला मिळणारे कमी दर आणि हे पीक काटेरी असल्याने काढण्यासाठी या पिकाला मजूर मिळत नाहीत.

राजरत्न सिरसाटअकोला - करडी तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असून, विदर्भात दोन लाख हेक्टरवर असणारे करडीचे हे क्षेत्र केवळ पंधराशे हेक्टरच्या कमी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने करडी पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. पण, उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळत नसल्याने करडीचे क्षेत्र नामशेष होण्याची भिती कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

सन 1999-2000 पर्यंत राज्यात करडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. परंतु, या पिकाला मिळणारे कमी दर आणि हे पीक काटेरी असल्याने काढण्यासाठी या पिकाला मजूर मिळत नाहीत. परिणामी या पिकाचे क्षेत्र कमी होत गेले. 2011-12 पर्यंत राज्यात 1 लाख 23 हजार हेक्टर क्षेत्र होते. विदर्भात तर दोन लाख हेक्टर असलेले हे क्षेत्र याच कारणामुळे कमी झाले. आता, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात पंधराशे तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात केवळ एक हेक्टर क्षेत्र उरले आहे. अमरावती विभागाचे उत्पादन हे 2 हजार मेट्रिक टन आणि उत्पादकता 495 किलो प्रतिहेक्टर तर नागपूर विभागातील उत्पादन 325 मेट्रिक टन आणि उत्पादकता 325 किलो प्रतिहेक्टर होती. राज्यातील करडीचे हे उत्पादन 67 हजार मेट्रिक टन आणि उत्पादन 545 किलो प्रतिहेक्टरी होते. आता, गेल्या पाच वर्षांपासून विदर्भातील करडीचे क्षेत्र झपाट्याने घसरले आहे.

गुलाबीडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने करडीची पिंक ही नवी जात विकसित केली आहे. हेक्टरी 15 ते 21 क्विंटल उत्पादन देणारी ही जात 130 ते 135 दिवसात परिपक्व होते. विशेष म्हणजे या करडीपासून 32 टक्के तेल मिळते. कृषी विद्यापीठाने रब्बीमध्ये या पिकाचे क्षेत्र वाढीसाठी कार्यक्रम आखला पण त्याला शेतकऱ्यांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही. 

केवळ 450 क्विंटल बियाणांचे नियोजनमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज)मागच्यावर्षी राज्यासाठी 900 क्विंटल करडी बियाण्यांचे नियोजन केले होते. तथापि क्षेत्रात घट झाल्याने यावर्षी संपूर्ण राज्यासाठी केवळ 450 क्विंटल नियोजन केले आहे. प्रत्यक्षात बाजारात किती आणणार हे ठरायचे आहे. करडीला अपेक्षीत दर मिळत नसल्याने करडीचे क्षेत्र कमी झाले हे क्षेत्र वाढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू  आहेत.डॉ.संजय साखरे, विभाग प्रमुख,तेलबिया, डॉ.पंदेकृवि, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी